ताटात नाही भाकर अन् वाढतेय शस्त्रांची भूक! पाककडून एकाच महिन्यात तिसऱ्यांदा मिसाइलची चाचणी
By मोरेश्वर येरम | Updated: February 11, 2021 19:57 IST
1 / 7पाकिस्तान सरकारला कोरोना लसीची गरज पूर्ण करण्यासाठी जगाकडे पदर पसरावा लागतोय पण दुसरीकडे या देशाकडून शस्त्रांची चाचणी मात्र काही केल्या थांबताना दिसत नाहीय. 2 / 7पाकिस्तानने गुरुवारी आणखी एका मिसाईलची यशस्वी चाचणी केली. गेल्या तीन आठवड्यातील ही तिसरी चाचणी ठरली आहे. 3 / 7जमीन आणि पाण्यातील शत्रूवर मारा करणाऱ्या ''बाबर मिसाईल'' या अत्याधुनिक मिसाईलची यशस्वी चाचणी केल्याची माहिती पाकिस्तानच्या लष्कराने दिली आहे.4 / 7अत्याधुनिक मल्टी ट्यूब परीक्षण वाहनाने ही मिसाईल डागण्यात आली. तब्बल ४५० किमी पर्यंतचं लक्ष्य भेदण्याची या मिसाइलची क्षमता असल्याचा दावा पाकिस्तानने केला आ5 / 7पाकिस्तानने याआधी ३ फेब्रुवारी रोजी २९० किमीपर्यंतची मारक क्षमता असलेल्या बॅलेस्टीक मिसाइलची चाचणी केली होती. तर त्याआधी २० जानेवारी रोजी बॅलेस्टीक मिसाईल शाहीन-३ ची चाचणी घेतली होती. 6 / 7पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी, पंतप्रधान इमरान खान आणि ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटीचे अध्यक्ष जनरल जुबैर महमूद हयात यांनी पाकिस्तानच्या यशस्वी मिसाइल चाचणीबद्दल पाक लष्कराचं अभिनंद केलं. 7 / 7एका बाजूला देशाच्या डोक्यावर कर्जाचं ओझं वाढत असताना दुसऱ्या बाजूला अशा महागड्या शस्त्र चाचण्या घेणं काही पाकिस्तान थांबवण्याचं नाव घेत नाहीय. यावरुन पाकिस्तानवर जागतिकस्तरावर जोरदार टीका केली जातेय.