1 / 7पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सीमेपलिकडे आश्रय घेणाऱ्या दहशतवाद्यांवर पलटवार केला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील तब्बल ९ ठिकाणे भारताने उडवली. यात जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयाचाही समावेश आहे.2 / 7मेक्सार टेक्नॉलॉजीच्या मदतीने हे सॅटेलाईट फोटो घेण्यात आले आहेत. यात पाकिस्तानातील बहावलपूरमधील जामिया मशीद आणि जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय मरकज सुभानल्लाह दिसत आहे.3 / 7भारतीय लष्कराने मिसाईल डागण्यापूर्वी ही दोन्ही ठिकाणे अवकाशातून कशी दिसत होती आणि नंतर त्यांची अवस्थात काय झाली आहे, हे फोटोत स्पष्टपणे दिसत आहे.4 / 7भारताने केलेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांचे वास्तव्य असलेल्या जामिया मशिदीची अवस्था कशी झाली आहे, याचे तीन फोटो सॅटेलाईटमधून टिपण्यात आले आहेत.5 / 7भारतीय लष्कराने मुरिदके शहरातील दहशतवाद्यांच्या एका अड्ड्यावरही हवाई हल्ला केला. पहिल्या हिरवळ दिसत असलेला पहिला फोटो हा हल्ला करण्यापूर्वीचा आहे. तर दुसरा फोटो भारताने हे ठिकाण लक्ष्य केल्यानंतरचा आहे.6 / 7भारताने जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय मरकज सुभानल्लाहही उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ठिकाण आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी आतमध्ये आहे. इथेच दहशतवाद्यांची भरती करण्याचे काम केले जात होते.7 / 7मरकज सुभानल्लाहमध्येच भारताविरोधात घातपाताचे कट रचले जात होते. इथेच दहशतवाद्यांना प्रशिक्षणही दिले जात होते. इथेच करण्यात आलेल्या हल्ल्यात मोस्ट वाॉन्टेड दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील १० जण आणि त्याच्या जवळचे ४ साथीदार ठार झाले आहेत.