जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 13:07 IST
1 / 10Nuclear Power Contries: स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या वार्षिक अहवालानुसार, जानेवारी 2025 पर्यंत जगातील 9 देशांकडे मिळून एकूण 12,241 अण्वस्त्रे आहेत. यापैकी सुमारे 2,100 अण्वस्त्रे ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आली असून, ती काही मिनिटांत वापरण्यास सज्ज आहेत. दरम्यान, कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्रे आहेत, जाणून घ्या...2 / 10रशिया- 5,459 अण्वस्त्रांसह रशिया जगातील सर्वात मोठा अण्वस्त्रसाठा असलेला देश आहे. रशियाने अनेक अण्वस्त्रे हाय अलर्टवर ठेवली आहेत.3 / 10अमेरिका- या यादीत 5,177 अण्वस्त्रांसह अमेरिका दोन नंबरवर असून, सतत आपल्या साठ्यात वाढ करत आहे.4 / 10चीन- देशात सध्या वेगाने अण्वस्त्रांचा साठा वाढवला जात आहे. सध्या चीनकडे 600 अण्वस्त्रे आहेत. 5 / 10फ्रान्स- 290 अण्वस्त्रांसह फ्रान्स युरोपातील प्रमुख अण्वस्त्रदेश आहे.6 / 10ब्रिटन- हा देश ट्रायडेंट मिसाइल प्रणालीवर अवलंबून आहे. ब्रिटनकडे 225 अण्वस्त्रांसह मर्यादित पण आधुनिक साठा आहे.7 / 10भारत- आपला देश ‘नो फर्स्ट यूज’ धोरणाचे पालन करतो. भारताकडे सध्या 180 अण्वस्त्रे असून, हा साठा वाढवण्यावर भर सुरू आहे.8 / 10पाकिस्तान- भारतापाठोपाठ पाकिस्ताकडे 170 अण्वस्त्रांचा साठा आहे. पण, अलिकडील अहवलानुसार, पाक आपली अण्वस्त्रे वाढवत आहे.9 / 10इस्रायल- 90 अण्वस्त्रांसह इस्रायल आठव्या स्थानावर आहे. 10 / 10उत्तर कोरिया- किम जोंगच्या नेतृत्वातील उत्तर कोरियाकडे 50 अण्वस्त्रे असल्याचा अंदाज आहे.