नॉस्ट्रॅडॅमसची धडकी भरवणारी भविष्यवाणी! जगातील हा शक्तीशाली देश उद्धवस्त होणार; युरोपात हाहाकार माजणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 17:28 IST
1 / 7नॉस्ट्रॅडॅमसने 2025 साठी केलेल्या भविष्यवाणीमध्ये विनाशकारी घटनांचा उल्केख करण्यात आला आहे. यात युरोपात युद्ध, इंग्लंडचे उद्धवस्त होणे आणि न्या जागतिक शक्ती उदयाला येण्याचा समावेश आहे.2 / 72025 मध्ये युरोप गंभीर युद्धांमध्ये व्यस्त राहील. या युद्धांचा परिणाम युरोपातील स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्थितीवरही पडेल, अशी भविष्यवाणी नॉस्ट्रॅडॅमसने केली होती.3 / 7नॉस्ट्रॅडॅमसच्या मते, युद्धामुळे युरोपात शत्रूंचा प्रभाव वाढेल. हे युद्ध युरोपच्या सीमेत सुरू होईल आणि आणि युरोपला अस्थिरतेच्या दिशेने घेऊन जाईल.4 / 7नॉस्ट्रॅडॅमसने ब्रिटनसंदर्भातही एक धडकी भरवणारी भविष्यवाणी केली आहे. संघर्ष आणि प्लेगनंतर, ब्रिटन उजाड अथवा उद्धवस्त होईल. या देशात ख्रिश्चन धर्माला मानणारे लोक अधिक राहतात. मात्र गेल्या काही वर्षांत, येथे मुस्लीम लोकसंख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. 5 / 7नॉस्ट्रॅडॅमसच्या या भविष्यवाणीच्या विचार करता, ब्रिटनला युद्ध आणि महामारी सारख्या परिस्थितींचाही सामना करावा लागू शकतो.6 / 72025 वर्षात पश्चिमेकडील शक्तींचा प्रभाव कमी होईल आणि नव्या शक्तींचा उदय होईल. यात, जागतिक राजकारण आणि शक्ती संतुलनात मोठा बदल दिसू शकतो.7 / 7नॉस्ट्रॅडॅमसची भाकितं अमेरिका आणि युरोपच्या कमकुवतपणाकडे आणि आशियाई देशांच्या वाढत्या प्रभावाकडे निर्देश करतात.