शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Nostradamus: या वर्षी येणार 'ही' मोठी आपत्ती! नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीनं जगाला भरलीय धडकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 3:47 PM

1 / 8
जगातील महान भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. यात हिटलरची राजवट, दुसरे महायुद्ध, 9/11 चा हल्ला आणि फ्रेंच राज्यक्रांती यांचाही समावेश आहे. नॉस्ट्रॅडॅमस यांनी केलेली जवळपास 85 टक्के भाकीत खरी ठरली आहेत.
2 / 8
नॉस्ट्रॅडॅमसने 2022 संदर्भातही काही भाकिते केली आहे. त्यांनी 500 वर्षांपूर्वी केलेली ही भाकिते जाणून अनेकांना धक्का बसेल. नॉस्ट्रॅडॅमस यांचा जन्म 14 डिसेंबर 1503 रोजी जर्मनीमध्ये झाला होता आणि 2 जुलै 1566 साली त्यांचा मृत्यू झाला.
3 / 8
यावर्षी अणुबॉम्बचा स्फोट होण्याचं भाकीत - नॉस्ट्रॅडॅमसने 2022 संदर्भातील आपल्या भविष्यवाणीत म्हटले आहे, या वर्षात अणुबॉम्बचा स्फोट होईल, यामुळे हवामानात बदल होईल. एवढेच नाही, तर अणुबॉम्बच्या स्फोटामुळे पृथ्वीची स्थितीही बदलू शकते, असेही नॉस्ट्रॅडॅमसने म्हटले आहे.
4 / 8
महागाईसंदर्भातही केली होती भविष्यवाणी - नॉस्ट्रॅडॅमसने 500 वर्षांपूर्वीच 2022 च्या महागाईसंदर्भातही भविष्यवाणी केली होती. नॉस्ट्रॅडॅमसच्या भाकितानुसार, याविर्षी महागाई नियंत्रणाबाहेर जाईल. याशिवाय, अमेरिकन डॉलरमध्ये मोठी घसरण होईल. एवढेच नाही, तर 2022 मध्ये लोक सोने, चांदी आणि बिटकॉईनमध्ये अधिक गुंतवणूक करतील.
5 / 8
लघुग्रहामुळे मोठे नुकसान होईल - नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीनुसार, 2022 मध्ये एक लघूग्रह पृथ्वीचे मोठे नुकसान करेल. नॉस्ट्रॅडॅमस यांनी म्हटले आहे, की एक मोठा दगड समुद्रात पडेल. यामुळे मोठमोठ्या लाटा उसळतील आणि चहूबाजूंनी पृथ्वीला घेरतील. समुद्राच्या पाण्यामुळे पृथ्वीचे मोठे नुकसान होईल.
6 / 8
फ्रान्समध्ये एका मोठ्या वादळामुळे विनाश - नॉस्ट्रॅडॅमसच्या भाकितानुसार, या वर्षी फ्रान्समध्ये एक मोठे वादळ येईल. यामुळे जगातील अनेक भागांमध्ये भीषण आगीशिवाय, दुष्काळ आणि पूर स्थितीही बघायला मिळू शकते.
7 / 8
संपूर्ण जगात 72 तास अंधार होईल - नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या भविष्यवाणीत म्हटले आहे, की 2022 मध्ये मोठ्या विनाशानंतर, शांतता येईल. मात्र, या शांततेनंतर, संपूर्ण जगात 3 दिवस म्हणजेच 72 तास अंधःकार निर्माण होईल.
8 / 8
मानवावर असेल आर्टफिशल इंटेलिजन्सचे नियंत्रण - नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीनुसार, 2022 मध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्सचे मानव जातीवर नियंत्रण असेल. तसेच, पर्सनल कंप्यूटरचे ब्रेन मानवावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असेल. याशिवाय, रोबोट मानव जातीला नष्ट करतील.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषGermanyजर्मनीFranceफ्रान्सBlastस्फोटnuclear warअणुयुद्ध