कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:00 IST
1 / 10नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून Gen Z आंदोलनामुळे देशातील परिस्थिती बिघडली आहे. हिंसक आंदोलनामुळे तिथलं सरकार कोसळले आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा देत अज्ञातस्थळी गेले आहेत. 2 / 10नेपाळमधील पंतप्रधानापासून सर्व मंत्र्यांचे राजीनामे अशा वेळी आले आहेत, जेव्हा देशभरात युवकांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. 3 / 10या आंदोलनातून काही युवा नेतेही तयार झाले आहेत. त्यातीलच एक युवक विद्यार्थी अविष्कार राऊत...ज्याचे भाषण सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बरेच जण गुगलवर अविष्कार राऊत याच्याविषयी सर्च करत आहे. 4 / 10नेपाळ सरकारविरोधात सुरू झालेल्या आंदोलनात अविष्कार राऊत हिरो बनला आहे. त्याचे भाषण सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. मार्च २०२५ मध्ये त्याच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात अविष्कारने केलेले तुफानी भाषण सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.5 / 10हिटलर स्टाईल भाषणानं सगळेच अवाक् - अविष्कार राऊतने शाळेतील त्याच्या भाषणात नेपाळमधील भ्रष्टाचार, बेरोजगारी, राजकीय मुद्द्यांवर अतिशय परखडपणे भाष्य केले. या भाषणामुळे युवकांमध्ये जागरूकता आणि परिवर्तनाची आग निर्माण झाली. 6 / 10अविष्कार राऊत याने शाळेत केलेले भाषण थेट युवकांच्या मनाला भिडले. नेपाळमध्ये सुरू झालेले Gen Z आंदोलन त्याच्या नेतृत्वात झाले नसले तरीही अविष्कारच्या भाषणाने युवकांमध्ये आंदोलनाची वात पेटली. या आंदोलनामुळे नेपाळमधील सरकार कोसळले. 7 / 10खरं तर, अविष्कार राऊत हा मोटिवेशनल स्पीकर आहे. त्याच्या भाषणाने नेपाळमधील तरुण पिढीमध्ये जागरूकता आणि उत्साह जागृत करण्याचे काम केले आहे. मार्चमध्ये त्यांनी अॅडॉल्फ हिटलरच्या शैलीतील एक धाडसी भाषण दिले होते. आता Gen Z आंदोलनामध्येही तो उतरला आहे. या आंदोलनाने देशाची राजकीय व्यवस्था हादरवून टाकली आहे. राऊत याच्या 'जय नेपाळ' भाषणाने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.8 / 10शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात भाषण देत असताना अविष्कार राऊत याला हे माहितही नसेल की सहा महिन्यांनंतर तो एका मोठ्या आंदोलनात चर्चेचे केंद्रबिंदू बनेल, ज्यामध्ये ना केवळ अनेक लोकांचा मृत्यू झाला तर पंतप्रधान आणि अनेक राष्ट्रप्रमुखांना त्यांच्या पदांवरून राजीनामा द्यावा लागला.9 / 10अविष्कार राऊतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये राऊत माइक धरून आणि घोषणाबाजी करत सक्रियपणे सहभागी होताना दिसला. त्यांच्या मागे तरुण विद्यार्थ्यांचा एक गट दिसत होता.10 / 10नेपाळमध्ये केपी शर्मा ओली सरकारविरुद्ध सुरू असलेलं आंदोलन 'Gen Z' ने चालवले आहे. या चळवळीचे नेतृत्व सुदान गुरुंग करत आहेत. ते डीजेपासून सक्रिय सामाजिक कार्यकर्ते बनले, त्यांनी सोशल मीडिया आणि रॅलीद्वारे तरुणांना संघटित करण्याचं काम केले. म्हणूनच गुरुंग यांना चळवळीचा चेहरा मानले जात आहे.