शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rocio Pino: मॉडेल बनली नेता, प्रचाराच्या पोस्टरवर न्यूड फोटो; मतांसाठी असे आश्वासन दिलेय की....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 4:27 PM

1 / 10
मेक्सिकोमध्ये सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. येत्या 6 जूनला तिथे मतदान होणार आहे. परंतू एका मॉडेलने तेथील वातावरण पुरते तंग करून टाकले आहे. तिची प्रचाराची पद्धत पाहून भले भले नेते गपगार झाले आहेत. (Rocio Pino: OnlyFans Model Joins Politics and Promises to All Women)
2 / 10
ओन्ली फॅन्स मॉडेलहून राजकीय पुढारी बनलेली रोसियो पिनो सध्या खूप चर्चेत आहे. पिनो ही ओन्ली फॅन्सवर खूप लोकप्रिय असून तिचे जवळपास 60 हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत.
3 / 10
रोसियो पिनो ही सेंटर लेफ्ट प्रोग्रेसिव्ह सोशल नेटवर्क पार्टीची उमेदवार आहे. 2019 मध्ये एनजीओ सुरु झाला होता. पुढे 2020 मध्ये या एनजीओचा राजकीय पक्ष बनला आहे. चार दिवसांनी मेक्सिकोमध्ये मतदान होणार आहे.
4 / 10
रोसियो ही सोनोरा येथून निवडणूक लढवत आहे. ती निवडणूक प्रचारावेळी पोस्टरवर न्यूड फोटो छापल्याने खूप चर्चेत आली होती. यावेळी मोठा वादही झाला होता.
5 / 10
अशा कॅम्पेनमुळे मला स्वस्त लोकप्रियता नकोय. सामाजिक स्तरावर महिलांच्या उद्धारासाठी आणि सशक्तीकरणासाठी काम करायचे आहे. यामुळे मी मॉडेलिंग सोडून नेता बनली आहे, असे तिने यावर स्पष्टीकरण दिले.
6 / 10
पिनोने तिच्या वेबसाईटवर लिहिले आहे की, 2017 मध्ये चियापसमध्ये आलेल्या भूकंपावेळी मी स्वयंसेवकाचे काम केले होते. तेव्हा लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला होता. या अनुभवानंतर तिच्यात बदल झाले आणि राजकारणात येण्याचा निर्णय घेतला.
7 / 10
पिनोने न्यूड पोस्टरवरून चर्चा होत असताना मेक्सिकोच्या महिलांना एक मोठे आश्वासन देऊन टाकले आहे. जर ती निवडून आली तर महिलांसाठी ब्रेस्ट सर्जरी मोफत केली जाणार आहे.
8 / 10
हे आश्वासन अशा महिलांसाठी आहे, ज्यांना कॅन्सरमुळे ब्रेस्ट ऑपरेशन करून हटवावे लागले होते.
9 / 10
पिनो ही ट्विटरवरदेखील खूप लोकप्रिय आहे. तिचे 2 लाख 63 हजार फॉलोअर्स आहेत. ज्या राजकीय नेत्यांच्या कामाची पद्धत आऊटडेटेड आणि पारंपरिक आहे, अशा पुरुषसत्तावादी नेत्यांची आम्हाला गरज नाहीय, अशी पोस्ट तिने केली होती.
10 / 10
पिनोने याशिवाय मुलींच्या लहान वयात होणाऱ्या लैंगिक शोषणविरोधात जागरुकता करण्यासाठी मोहिम सुरु करण्याची घोषणा केली आहे. यामुळे लहान मुली गुड टच आणि बॅड टच बाबत सजग होतील. याशिवाय महिलांना सायबर क्राईमपासून वाचविण्यासाठीदेखील काम करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.
टॅग्स :Mexicoमेक्सिकोElectionनिवडणूक