By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 15:55 IST
1 / 9भारताविरोधात बरळणारी पाकिस्तानची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हरीम शाह गुगल सर्च लिस्टमध्ये अव्वल आली आहे. २०२३ मध्ये ती पाकिस्तानमध्ये सर्वाधिक सर्च केलेला व्यक्ती ठरली आहे.2 / 9पाकिस्तानमधील टॉप १० सर्चच्या यादीत हरीम पहिल्या क्रमांकावर आहे. हरीम शाहने भारतातील हिंदू देवी-देवतांवर आक्षेर्पाह विधान केले होते.3 / 9याशिवाय हरीम शाहने भारताच्या मून मिशन चांद्रयान-३ च्या लँडिंगवरही बेताल वक्तव्य केले होते. भारताविरूद्ध बरळताना तिने म्हटले होते की, चांद्रयान-३ वर खर्च झालेला पैसा भारताने शौचालय बांधण्यासाठी वापरायला हवा होता.4 / 9२०२३ मध्ये पाकिस्तानातील लोकांनी गुगलवर हरीम शाहला सर्वाधिक वेळा सर्च केले. भारताविरूद्ध बरळणारी हरीम तिच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असते.5 / 9हरीमने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या खुर्चीवर बसून एक व्हिडीओही बनवला होता. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात घुसून तिने व्हिडीओ केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. 6 / 9याच वर्षी एप्रिलमध्ये तिचा एक आक्षेर्पाह MMS व्हिडीओही व्हायरल झाला होता. हरीम शाहने आरोप केला होता की, ती आंघोळ करत असताना तिच्या एका जुन्या मित्राने एमएमएस लीक केला.7 / 9हरीम शाहचे इंस्टाग्रामवर ३ लाख ४० हजार फॉलोअर्स आहेत. बोल्ड अन् ग्लॅमरस फोटो पोस्ट करून हरीम प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करते. 8 / 9हरीम प्रसिद्धीसाठी कोणत्या थराला जाईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. तिने पाकिस्तानातील एका मंत्र्यावर देखील गंभीर आरोप केले होते.9 / 9हरीम प्रसिद्धीसाठी कोणत्या थराला जाईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. तिने पाकिस्तानातील एका मंत्र्यावर देखील गंभीर आरोप केले होते.