1 / 7Masood Azhar News in Marathi: भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेल्या जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरवर भारतीय लष्कराने न विसरता येणारा घाव घातला. ऑपरेशन सिंदूर राबवताना भारताने जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयच उडवले. यात मसूदच्या कुटुंबातील दहा लोकही ठार झाले.2 / 7७ मे रोजी भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्यात कुटुंबातील दहा जण आणि जवळचे चार असे एकूण चार लोक मारले गेल्याचे मसूद अजहरनेच सांगितलं आहे. त्याचे पत्रही समोर आले आहे. यात त्याने भारताच्या हल्ल्यात कोण कोण मारले गेले, हेही सांगितले.3 / 7७ मे रोजी भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्यात कुटुंबातील दहा जण आणि जवळचे चार असे एकूण चार लोक मारले गेल्याचे मसूद अजहरनेच सांगितलं आहे. त्याचे पत्रही समोर आले आहे. यात त्याने भारताच्या हल्ल्यात कोण कोण मारले गेले, हेही सांगितले.4 / 7यात जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरची मोठी बहीण, तिचा पती, त्याचा एक पुतण्या आणि त्याची पत्नी, एक भाची आणि कुटुंबातील पाच मुलं मारले गेले आहेत. इतर चार जण मारले गेले आहेत, ते मसूदच्या जवळचेच नातेवाईक होते. 5 / 7हल्ल्यात ठार झालेल्या मसूद अजहरच्या कुटुंबीयांच्या मृतदेहांचा एक फोटो समोर आला आहे. त्यात सर्व मृतदेह शवपेट्यांमध्ये आहेत आणि त्यावर पाकिस्तानचा ध्वज ठेवलेला असल्याचे दिसत आहे.6 / 7या हल्ल्यानंतर मसूद अजहरचे एक ऊर्दूतील निवेदनही समोर आले आहे. ज्यात त्याने म्हटले आहे की, माझ्या कुटुंबातील दहा लोक मारले गेले आहेत. माझी मोठी बहीण साहिबा, तिचा पती खाविंद, माझा पुतण्या फाजिल, त्याची पत्नी, माझी भाची आलिमा फाजिला, माझा आधीपासूनचा मित्र हुजैफा आणि दोन साथी यांच्यासह १४ जण मारले गेले आहेत.7 / 7हा आघात इतका भयंकर आहे की, शब्दही सूचत नाहीत. पण, मला पश्चाताप नाहीये, मी दुःखी पण नाहीये. आणि मी मागेही हटणार नाही. पण, मनात सारखा एक विचार येतोय की या १४ जणांसोबत मला मृत्यू यायला पाहिजे होता, असेही त्याने पत्रात म्हटले आहे.