1 / 8 उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांच्यावर कार्डियोवेस्क्युलेरची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली असल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. तसेच किम जोंग उन कोमात गेले असल्याचा दावा ब्रिटनच्या Dailymail या वृत्तपत्राने केला होता. त्याचप्रमाणे किम जोंग उन यांच्या मृत्यू झाला असल्याचा दावा देखील आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला होता. 2 / 8मात्र किम जोंग उन २० दिवसांनंतर जगासमोर आले होते. उत्तर कोरीयाई नेते प्योंगयांग यांच्या उत्तरेकडील सनुचोन येथे एका फॅक्टरीच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी किम जोंग सार्वजनिक कार्यक्रमात दिसले होते. 3 / 8 २० दिवसांनी जगासमोर आल्यानंतर किम जोंग उन पूर्णपणे ठणठणीत दिसत होते. त्यांनी स्वतःच संपूर्ण फॅक्ट्रीची पाहणी केली आणि उद्घाटन समारंभातही भाग घेतला होता. यावेळी येथे उपस्थित अलेल्या हजारो लोकांनी हात हलवून त्यांचे स्वागत केले. एवढेच नाही, तर किम जोंग यांनीही त्यांच्यात जाऊन त्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला होता. 4 / 8मात्र २० दिवसांनी जगासमोर आलेले किम जोंग उन नाही, तर त्यांचा ड्युप्लीकेट असल्याचा दावा आता करण्यात येत आहे. त्यामुळे किम जोंग उनच्या प्रकृतीबाबत आता पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.5 / 8सोशल मीडियावर शेअर करण्यात येत असलेली छायाचित्रे ट्विट करुन ब्रिटनचे खासदार लुईझी मेनश यांनी असा दावा केला की, २० दिवसांनंतर जगासमोर आलेली व्यक्ती किम जोंग उन नाही. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये किम जोंग उन यांच्या आधीच्या आणि आता समोर आलेल्या दातांमध्ये फरक दिसून येत आहे. मात्र काही जणांनी फोटोमध्ये काही बदलाव करण्यात आला असल्याचे देखील सांगितले आहे.6 / 8 किम जोंग उन यांच्या पूर्वीचा आणि २० दिवसांनंतर समोर आलेल्या फोटोमध्ये किम जोंगच्या दोन्ही कानांमध्ये देखील बदलाव दिसून येत आहे, असं सांगण्यात येत आहे. मात्र किम जोंग उन यांचे अनेक फोटो जुने असल्याचा दावा करण्यात येत आहे.7 / 8किम जोंग उन यांची शस्त्रक्रिया झाली नाही असा दावा उतत्त कोरियाने केला होता. मात्र किमच्या हातावर असणारे चट्टे सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे. मनगटावरचे हे चट्टे त्याच्या कथित शस्त्रक्रियेचे असल्याचा दावा केला जात आहे. या शस्त्रक्रियेनंतर किमची तब्येत ढासळली आहे असा अंदाज वर्तविला जात होता.8 / 8विशेष म्हणजे किम जोंग उन यांच्याबद्दलच नाही, तर किम जोंग यांची बहिण किम यो जोंग देखील ड्युप्लीकेट असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. मात्र यापैकी कोणते दावे अचूक आहेत, याबद्दल अजूनही समोर आलेले नाही.