By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 13:23 IST
1 / 9जपानमधील राजकुमारी माको हिने एका सामान्य व्यक्तीशी लग्न करून महिलांशी निगडित रूढी मोडत आणि प्रेमावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठीही एक आदर्श ठेवला आहे. दरम्यान, राजकुमारी माको हिने एका सामान्य कुटुंबीयातील मित्रासोबत लग्न केले आहे. 2 / 9प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी राजकुमारी माको हिने शाही दर्जा नाकारला आहे. आता माको आणि तिचा नवरा केई कोमुरो अमेरिकेत राहणार आहेत. जपानी मीडिया NHKच्या रिपोर्टनुसार, राजकुमारी माको आपल्या पतीसोबत न्यूयॉर्क शहरातील वन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहणार आहे.3 / 9राजकुमारी माको हिने आधीच टोकियोतील आपला शाही बंगला सोडला आहे. हे जोडपे सध्या टोकियोमध्ये एका अपार्टमेंटमध्ये राहणार आहेत. यानंतर ते अमेरिकेत जाण्याचा विचार करत आहे. 4 / 9अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील काही भागात (जसे की मॅनहॅटनचे वेस्ट मिलेज) एक बेडरूमच्या फ्लॅटचे भाडे 2.2 लाख ते 8.2 लाख रुपये प्रति महिना आहे. दरम्यान, माको हिचा नवरा वकील आहे आणि अमेरिकेत एका फर्ममध्ये काम करतो. 5 / 930 वर्षीय माको ही जपानचे क्राउन प्रिन्स फुमिहितो यांची मोठी मुलगी आहे. 8 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर माको हिने 26 ऑक्टोबरला प्रियकर केई कोमुरोसोबत लग्न केले. जपानमध्ये असा नियम आहेत की, जर एखाद्या महिलेने राजघराण्याबाहेरील सामान्य पुरुषाशी लग्न केले तर तिला शाही दर्जा सोडावा लागतो.6 / 9जपानच्या राजघराण्याशी संबंधित अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, राजकुमारी माको हिला राजघराण्यातून बाहेर पडल्यावर सुमारे 9 कोटी रुपये मिळण्याचा हक्क होता. परंतु राजकुमारीने हे पैसे घेण्यास नकार दिला. दरम्यान, राजकुमारी मोको आता अमेरिकेत नोकरी करण्यार असल्याचे सांगण्यात येते.7 / 9दरम्यान, जपानमध्ये राजकुमारी माको आणि केई कोमुरो यांच्या लग्नालाही विरोध सुद्धा झाला होता. विवाह सोहळा पार पडला. मात्र, राजघराण्यातील सदस्यांनी लग्नाला हजेरी लावली होती. लग्नानंतर या जोडप्याने पत्रकार परिषद घेऊन या लग्नामुळे काही लोकांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती.8 / 9राजकुमारी माको हिने सुरुवातीच्या काळात आपले रिलेशनशिप अत्यंत खाजगी ठेवले. ब्रिटनमध्ये शिक्षण घेतल्यानंतर तिने 2017 मध्ये जाहीर केले होते की, ती एका सामान्य माणसाशी लग्न करणार आहे. प्रदीर्घ वादानंतर जपानच्या क्राउन प्रिन्सेस यांनी माको हिच्या लग्नाला होकार दिला.9 / 9राजकुमारी माकोच्या आधी, तिची मावशी राजकुमारी सयाकोनेही राजकुमारीची पदवी परत केली आहे. तिने 2005 मध्ये एका टोकियो अधिकाऱ्याशी लग्न केले.