1 / 5भारतात अशी कोणतीही ट्रेन नाही जी संभाव्य स्थानकावर नियोजित वेळेत पोहचली असेल. काही मिनिटे नाही तर तासनतास काही ट्रेन उशीरा धावत असतात. मात्र तुम्हाला ऐकून धक्का बसेल जगातील एक देश असा आहे ज्याठिकाणी ट्रेन 60 सेकंदापेक्षा जास्त उशीर करत नाही. जर ट्रेन लेट झाली तर रेल्वेला माफी मागावी लागते. 2 / 5या देशाचं नाव आहे जपान, ज्याठिकाणी वेळेचे बंधन काटेकोटपणे पाळावचं लागतं. येथील बुलेट ट्रेनला शिंकासेन नावानं ओळखलं जातं. जपानमध्ये प्रत्येक तीन मिनिटाच्या अंतरावर बुलेट ट्रेन धावते. सर्वात वेगवान असूनही आजतागायत या ट्रेनचा अपघात झालेली घटना नाही. 3 / 5जपानच्या या बुलेट ट्रेनला आधुनिक तंत्रज्ञानावर बनवली गेली आहे. यामध्ये आधुनिक सेंसर लावण्यात आला आहे. यामुळे भूकंपाची अथवा कोणत्या अपघाताची जाणीव झाल्यावर लगेच ही ट्रेन स्वत:च्या वेगावर नियंत्रण आणते. 4 / 5जपानच्या शिंकासेन बुलेट ट्रेनच्या वेळेचं नियोजन जगात प्रसिद्ध आहे. येथे रेल्वेचे नियम इतके कठोर आहेत की, जर ट्रेन काही सेकंदासाठीही लेट आली तर रेल्वे विभागाकडून प्रत्येक प्रवाशाची वैयक्तिक माफी मागितली जाते. 5 / 5जपानचा रेल्वे विभाग प्रवाशांना लेट नोट्सपण देतं. कारण नोकरदार वर्ग ऑफिसला पोहचण्यासाठी लेट झाल्याचं कारणाची माहिती देतं. माध्यमांच्या रिपोर्टनुसार जपानमधील रेल्वे एकदा 20 सेकंद लवकर पोहचली म्हणूनही प्रवाशांची माफी मागितली होती.