इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 19:55 IST
1 / 12 मागच्या काही दिवसांमध्ये इस्राइलने हिजबुल्लाहवर तुफानी हल्ले करून त्याच्या अनेक बड्या नेत्यांसह या संघटनेचा प्रमुख असलेल्या हसन नसरुल्लाह याचाही खात्मा केला आहे. इस्राइलच्या या धडक कारवाईमुळे हिजबुल्लाह या संघटनेसह तिच्यामागे उभ्या असलेल्या इराणलाही मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, इस्राइलने हिजबुल्लाहच्या नेत्यांचा कधी, कुठे आणि कसा खात्मा केला, याचा आपण आज आढावा घेवूयात.2 / 12 हिजबुल्लाहचा प्रमुख असलेला हसन नसरुल्लाह हा २७ सप्टेंहर रोजी इस्राइलने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये मारला गेला. १९९२ पासून मृत्यूपर्यंत तो या संघटनेचा प्रमुख होता. 3 / 12नसरुल्लाहसोबत बेरुतमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात इस्राइलने अली कराकी यालाही ठार मारण्यात आले. अली कराकी हा हिजबुल्लाहच्या दक्षिण आघाडीचा प्रमुख होता. 4 / 12इस्राइलच्या सैन्याने २६ सप्टेंबर रोजी मोठा हल्ला करून मोहम्मद हुसेन सरूर याला ठार केले होते. 5 / 12इस्राइलने २४ सप्टेंबर रोजी इब्राहिम मोहम्मद कबीसी याला ठार केलं होतं. तो हिजबुल्लाहच्या मिसाईल आणि रॉकेट युनिटचा कमांडर होता. तो १९८० मध्ये हिसबुल्लाहमध्ये दाखल झाला होता. 6 / 12इब्राहिम अकील याला इस्राइलने २१ सप्टेंबर रोजी ठार केले होते. तो राडवान फोर्सचा ककमांडर होता. त्याने १९८३ मध्ये बेरुतमध्ये अमेरिकन दूतावासावर हल्ला केला होता. त्यात ६३ लोकांचा मृत्यू झाला होता. 7 / 12२० सप्टेंबर रोजी इस्राइलने अबू हसन समीर याला ठार मारले होते. अबू हसन समीर हा १० वर्षांपर्यंत राडवान फोर्सचा कमांडर राहिला होता. सध्या तो या फोर्सच्या ट्रेनिंग युनिटचा प्रमुख होता. 8 / 12 इस्राइलने ३० जुलै रोजी केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये फुआद शुकर ठार झाला होता. फुआद हा नसरुल्लाहचा उजवा हात मानला जात असे. तसेच तो हिजबुल्लाहचा टॉप कमांडर होता. 9 / 12इस्राइलने ३ जुलै रोजी हिजबुल्लाहच्या अजीज युनिटचा कमांडर मोहम्मद नासिर याला ठार मारले होते. अजीज युनिट हे दक्षिण-पश्चिम लेबेनॉनमध्ये सक्रिय आहे. 10 / 12दक्षिण लेबनॉनमध्ये सक्रिय असलेल्या तालेब सामी अब्दुल्ला याला इस्राइलने १२ जून रोजी हवाई हल्ला करून ठार मारले होते. तो अल नस्र गटाचा प्रमुख होता. 11 / 12८ जानेवारी रोजी ५८ वर्षीय अल-तवील याला इस्राइलने ठार केले होते. 12 / 12२९ सप्टेंबर रोजी इस्राइलने हिजबुल्लाहचा कमांडर हसन खलील यासिनला ठार केले होते. यासिन हा गुप्तहेर विभागाच्या एका गटाचा प्रमुख होता.