शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

इराणच्या नव्या निर्णयाने पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? आता प्रत्येक बॅरलवर टोल वसूल करणार इराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 17:34 IST

1 / 7
Iran Toll On Oil Barrel : जगातील सगळ्यात महत्वाच्या होर्मुज सामुद्रधुनीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून खूप जास्त सुरू आहे. ही सामुद्रधुनी बंद झाल्याने जगातील कितीतरी देशांना मोठा फटका बसला. आता हे तेलाचा पुरवठा करणारा मार्ग होर्मुज स्ट्रेट एक टोल नाका बनणार आहे. इराण आणि अमेरिकेतील सीजफायरनंतर स्थिती सामान्य होईल अशी अपेक्षा होती. पण इराणच्या नव्या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसलाय. आता या होर्मुजहून जाणाऱ्या प्रत्येक तेल टँकरला आपल्या क्षमतेनुसार कोट्यावधी रूपयांचा टोल भरावा लागणार आहे.
2 / 7
इराण आणि अमेरिकेत दोन आठवड्यांसाठी सीजफायर झाला. हा सीजफायर होत असताना सगळ्यात मोठी आणि महत्वाची अट होती की, इराण होर्मुज स्ट्रेट जहाजांसाठी खुलं करेल. सुरूवातीला मार्ग मोकळाही केला गेला. पण लेबनानवर इस्त्राइलचे हल्ले सुरू असलेल्या हा मार्ग पुन्हा बंद केला गेला. आता असं समोर येतंय की, इराण हा मार्ग पूर्णपणे उघडण्याच्या बदल्यात तेल टँकरांकडून टॅक्स वसूल करण्याच्या तयारीत आहे.
3 / 7
इराणने इशारा दिला आहे की, कोणतंही जहाज विना परवानगी या मार्गाचा वापर करणार नाही. प्रत्येक जहाजाला आपल्या जहाजात असलेल्या मालाची आणि तेलाची माहिती आधी ई-मेलने द्यावी लागेल. त्यानंतर इराण ठरवेल की, किती टोल घ्यायचा आहे. जर कुणी नियमांचं उल्लंघन केलं तर इराण जहाजावर थेट हल्ला करेल.
4 / 7
इराणच्या या नव्या योजनेनुसार, तेलाच्या प्रत्येक बॅरलवर एक डॉलर टोल घेतला जाईल. एक डॉलर जरी वाचायला कमीच वाटत असेल, पण जेव्हा लाखो बॅरल जहाजात असतील तर विचार करा ही रक्कम किती होईल. म्हणजे तेल आणणाऱ्या जहाजांसाठी हा मार्ग चांगलाच महागात पडणार आहे.
5 / 7
समुद्रात चालणाऱ्या तेलाच्या सामान्य आणि मोठ्या टँकरला VLCC म्हटलं जातं. यांमध्ये जवळपास २० लाख बॅरल कच्चं तेल असतं. याचा अर्थ केवळ का टँकरला या मार्गातून बाहेर येण्यासाठी २० लाख डॉलर टोल द्यावा लागेल. बरेच असे जहाज असतात ज्यांमध्ये ४० लाख बॅरलपर्यंत तेल असतं. विचार करा त्यांना किती टोल द्यावा लागेल.
6 / 7
जहाजांच्या आकाराच्या हिशेबाने हा टॅक्स वेगवेगळा असेल. मध्य श्रेणीच्या Suezmax टँकरमध्ये साधारणपणे १० लाख बॅरल तेल येतं. ज्यावर १० लाख डॉलर टोल लागेल. एका बॅरलमध्ये १५९ लीटर कच्चं तेल असतं. म्हणजे प्रत्येक लीटरवर टॅक्स लागेल.
7 / 7
भारतावर या गोष्टी मोठा प्रभाव पडणार आहे. कारण भारत आपल्या गरजेच्या जवळपास ८० ते ८५ टक्के दुसऱ्या देशांकडून खरेदी करतो. भारताचा तेल आयात करण्याचा खर्च आधीच जास्त आहे. अशात जर प्रत्येक बॅरलवर एक डॉलर टोल द्यावा लागेल तर बिल अब्जो रूपये निघेल. याचा थेट प्रभाव पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर पडेल. ज्यामुळे महागाई वाढण्याचा धोका असेल.
टॅग्स :IranइराणCrude Oilखनिज तेलUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर