शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 11:47 IST

1 / 8
ज्योतिषीय गणितांनुसार, वर्ष २०२६ हे पाकिस्तानसाठी अत्यंत अशुभ आणि संकटाचे वर्ष ठरू शकते. अनेक प्रमुख ज्योतिषांनी पाकिस्तानच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती लक्षात घेऊन असा धक्कादायक अंदाज वर्तवला आहे की, २०२६ मध्ये पाकिस्तानला मोठे सत्तासंकट, अंतर्गत गृहकलह आणि आर्थिक दिवाळखोरीमुळे अस्तित्वाचा धोका निर्माण होऊ शकतो. काही ज्योतिष तर पाकिस्तानचे तुकडे होण्याची शक्यताही वर्तवत आहेत.
2 / 8
गुरु-शनी आणि राहू-केतूचे गोचर: ज्योतिषीय विश्लेषणानुसार, २०२६ मध्ये गुरु, शनी, राहू आणि केतू या प्रमुख ग्रहांचे गोचर पाकिस्तानच्या कुंडलीतील जनता, सत्ता आणि सीमांशी संबंधित असलेल्या घरांवर अत्यंत नकारात्मक प्रभाव टाकत आहे.
3 / 8
मारकेश शुक्राची महादशा: पाकिस्तानच्या मेष लग्न कुंडलीत शुक्र हा ग्रह मारकेश आहे. सध्या सुरू असलेली शुक्राची महादशा आणि बुधची अंतरदशा मृत्युतुल्य कष्ट देणारे योग दर्शवत आहेत.
4 / 8
खप्पड योग: काही ज्योतिषांनुसार, पाकिस्तानच्या कुंडलीत लवकरच 'खप्पड योग' नावाचा एक अत्यंत विनाशकारी योग तयार होत आहे, ज्यामुळे महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊन देशाचा विनाश होऊ शकतो.
5 / 8
अंतर्गत बंडाळी: शनि संपूर्ण वर्षभर मीन राशीतून बाराव्या भावात राहील. यामुळे कर्जाचा बोजा, परदेशी दबाव आणि गुप्त कारवाया वाढतील. या काळात (विशेषतः जुलै-ऑगस्ट २०२६ पर्यंत) बलुचिस्तान आणि इतर प्रांतांमध्ये हिंसक उठाव होऊन पाकिस्तानचे दोन किंवा तीन तुकडे होऊ शकतात.
6 / 8
भारताच्या कुंडलीतील मंगळाच्या स्थितीमुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडतील आणि सीमावर्ती भागातील तणाव पराकोटीला पोहोचेल. भारताच्या कुंडलीतील मजबूत स्थितीमुळे भारताचे वर्चस्व वाढेल आणि पाकव्याप्त काश्मीर देखील भारताच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे.
7 / 8
मंगळ ग्रह भारताची ताकद कमालीचा वाढविणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला, ६ जानेवारी २०२६ रोजी, मंगळ शनीच्या राशीत, मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर, तो शनीच्या राशीत, कुंभ राशीत प्रवेश करेल. अग्नि तत्व असलेल्या मंगळाची शनीच्या राशीत उपस्थिती भारताला अधिक आक्रमक बनवेल. यानंतर कोणतीही शक्ती भारताला रोखू शकणार नाही.
8 / 8
ज्योतिषांच्या मते, २०२६ हे पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात काळे पर्व असू शकते. वरील सर्व अंदाज हे ज्योतिषशास्त्रानुसार असून लोकमत याची पुष्टी करत नाही.
टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानwarयुद्धIndian Armyभारतीय जवान