शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुर्कीचा भ्रमाचा भोपळा फुटला! अभेद्य समजला जाणारा बायरकतार ड्रोन भारताने पाडला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:08 IST

1 / 9
दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला आणि तुर्कीची दोन लष्करी मालवाहू विमाने इस्लामाबादला उतरली होती. या विमानांतून तुर्कीने सर्वात घातक समजला जाणारा बायरकतार ड्रोन आणि शस्त्रास्त्रे पुरविली होती. ही सामान्य फेरी होती असे जरी तुर्कीने सांगितले असले तरी नंतरच्या भारतावरील हल्ल्यांतील या ड्रोनची संख्या आणि भारताने पाडलेले तुर्कीचे बायरकतार ड्रोन पाहता तुर्कीच्या दगाबाजीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
2 / 9
भारतावर ड्रोन हल्ले करण्यासाठी तुर्कीने आपले सैन्य पुरविले होते. पाकिस्तानने या हल्ल्यांत दोन महत्वाची शस्त्रास्त्रांचा वापर केला होता. यात तुर्कीचा ड्रोन आणि चीनने दिलेली पीएल-१५ मिसाईल. तुर्कीचा ड्रोनही भारताच्या सहीसलामत हाती लागला आणि चीनचे मिसाईलही.
3 / 9
चीनच्या या मिसाईलला मिळविण्यासाठी आता अमेरिकाच नाही तर फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, ब्रिटेन आणि तैवान, जपानसारखे देश वाट्टेल ती किंमत मोजायला तयार आहेत. चीनचे हे मिसाईल काहीही न होता, बॅटरी डेड अवस्थेत सापडले आहे. यामुळे चीनचे हे मिसाईल आता जगासाठी उघडे पडलेले आहे.
4 / 9
भारत पाकिस्तान युद्धापूर्वी तुर्कीच्या ड्रोनची सर्वत्र हवा होती. कोणाला मागमूसही न लागता हा ड्रोन येतो आणि शत्रूच्या सैन्याला, त्याच्या चिलखती वाहनांना किंवा लढाऊ विमानांना उडवून जातो. या घातकी ड्रोनने रशिया-युक्रेन युद्धासह अन्य ठिकाणी सुरु असलेल्या हल्ल्यांत आपली ताकद जगाला दाखविली होती. यामुळे सार जग या बायरकतारच्या दहशतीखाली होते.
5 / 9
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या पारंपरिक शत्रूसोबतच तुर्कीदेखील हरला आहे. भारतीय सैन्याच्या स्वदेशी आकाशतीरने तुर्कीचे सर्व ड्रोन पाडले आहेत. यामुळे आता तुर्की आपली जी काही राहिलेली इज्जत वाचवण्याच्या प्रयत्नात आहे, तर ज्या देशांनी तुर्कीचा हा ड्रोन खरेदी केला आहे ते देखील दहशतीत आहेत.
6 / 9
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान नेहमीच त्यांच्या जावयाच्या कंपनीच्या या ड्रोनला 'इस्लामिक विचारसरणी'चे प्रतीक म्हणून वर्णन करत आले आहेत. या ड्रोनच्या शक्तीवर त्यांनी आफ्रिका, मध्य पूर्व आणि मध्य आशियामध्ये तुर्कीचा प्रभाव वाढविण्यास सुरुवात केली होती.
7 / 9
भारताच्या आकाशतीर या स्वदेशी एअर डिफेन्स सिस्टिमने तुर्की ड्रोनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे तुर्कीचा ड्रोन उद्योग धोक्यात आला आहे. भारताने पाडलेल्या ड्रोनमध्ये बायरकतार YIHA III कामिकाझे ड्रोन आणि सोंगात्री आणि eYatri सारखे छोटे ड्रोन देखील होते.
8 / 9
तुर्कीने पाकिस्तानातून भारताची संरक्षण व्यवस्था नष्ट करण्यासाठी हे ड्रोन हल्ले केले होते. सर्व ऑपरेटर तुर्कीचेच होते. पाकिस्तानच्या लढाऊ विमाने आणि तोफांना कव्हर करण्यासाठी हे हल्ले करण्यात आले. परंतू, एकही हल्ला यशस्वी होऊ शकला नाही. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.
9 / 9
एर्दोगन इस्लामच्या नावाखाली हे निकृष्ट ड्रोन इस्लामिक देशांच्या गळात मारू शकतात. पाकिस्तानचा पराभव इतका मोठा आहे की तो लपवणे शक्य नाही. भारताच्या सीमेवर पाकिस्तानी ड्रोनच्या तुकड्यांचा खच पडला आहे. सीमेवर हजारो तुर्की ड्रोनचे अवशेष दिसत आहेत.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला