1 / 5साहसी खेळ करण्यास ब-याचशा पर्यटकांना आवडते. परंतु साहसी पर्यटनासाठी तशी ठिकाणंही शोधावी लागतात. म्यानमारमधील बागान शहरही बौद्ध धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच इथे तुम्हाला हॉट एअर बलूनमध्ये फिरण्याची मज्जा लुटता येऊ शकते.2 / 5ऑस्ट्रेलियन तटावरील आउटवेकही पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. इथे तुम्हाला साहसी खेळांबरोबरच हॉट एअर बलूनमध्ये बसून निसर्गाच्या सौंदर्याची लयलूट करण्याचा आनंद मिळू शकतो. 3 / 5तुर्कीतलं कप्पाडोसिया एक महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळ आहे. कप्पाडोसिया हे ऐतिहासिक शहर आहे. तसेच हे शहर हॉट एअर बलून रायडिंगसाठीही प्रसिद्ध आहे. 4 / 5मसाई मारा इथलं केन्या आणि उत्तरी तांजानिया पर्यटनासाठी चांगली ठिकाणं आहेत. पर्यटकांचीही आवडती ठिकाणं असून, इथे तुम्हाला हॉट एअर बलूनच्या माध्यमातून उंच आकाशातून सुंदर नजारे पाहायला मिळतात. 5 / 5न्यूझीलंडमधलं क्वीन्सटाऊनही पर्यटकांमध्ये अत्यंत आवडतं आहे. तुम्हाला जर हॉट एअर बलूनमधून फिरण्याची इच्छा असेल तर हे एकदम बेस्ट ठिकाण आहे. इथे तुम्ही हॉट एअर बलूनमध्ये बसून निसर्गाचा भरपूर आनंद लुटू शकता.