शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इतिहास साक्षी आहे...! चिनी सैन्य युद्धास लायक राहिले नाही; अहवालाने उडविली जिनपिंग यांची झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:25 IST

1 / 8
चीन पुन्हा एकदा फुसका बार निघाला आहे. चिनी सैन्यावरील एका अहवालाने राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची झोप उडाली आहे. चीनकडे अमेरिकेच्या तोडीची शस्त्रास्त्रे, युद्ध सामग्री असल्याचे बोलले जाते. यामुळे चीनला शक्तीशाली देशांमध्येही स्थान आहे. असे असले तरी चिनी लष्कराबाबत आलेल्या नव्या अहवालाने सर्वांची झोप उडविली आहे. जेव्हा युद्धाची वेळ येईल तेव्हा चिनी सैन्य लढण्यासाठी योग्य नसेल असे या अहवालात म्हटले आहे.
2 / 8
अमेरिकी थिंक टँक रँड कॉर्पने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार चिनी सरकार सत्तेत बनून राहण्यासाठी सैन्याला सक्षम करत नाहीय, तसेच युद्धासाठी देखील तयार करत नाहीय, असा दावा करण्यात आला आहे.
3 / 8
चीन कम्युनिस्ट पार्टीनुसार सैन्याला मजबूत करणे म्हणजे देशावर आपली पकड मजबूत करणे आहे. कोणत्या बाहेरील देशासी लढण्यासाठी ते सैन्याला मजबूत करत नाहीत. यामुळे चिनी सैन्याचे संपूर्ण लक्ष जिनपिंग आणि कम्युनिस्ट पक्षाचे सरकार बनवून ठेवण्यावर आहे.
4 / 8
जिनपिंग सरकारने देखील चिनी सैन्याचे आधुनिकीकरण केवळ सरकारविषयी लोकांमध्ये आवड आणि विश्वसनियता वाढविण्यासाठीच केल्याचे या अहवालात म्हटले आहे. सीएनएनने याबाबतचे वृत्त दिले आहे.
5 / 8
धक्कादायक बाब म्हणजे चीनचे सैन्य दल प्रशिक्षण कालावधीचा ४० टक्के वेळ हा राजनैतिक विषयांवर वाया घालवित आहे. या वेळेचा उपयोग युद्धात निपुण करण्यासाठी केला जाऊ शकतो, परंतू तसे केले जात नाहीय. यामुळे चिनी सेना आधुनिक युद्धासाठी कितपत तयार आहे, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे हा अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या रँडच्या तज्ञांनी म्हटले आहे.
6 / 8
एवढेच नाही तर चीनच्या सैन्यात नेतृत्व करणारे लोक हे देखील राजकीयच असतात. ते युद्धाच्या क्षमतेऐवजी पक्षासाठी किती प्रामाणिक राहू याचा प्रयत्न करत असतात. चीनच्या सैन्याला भ्रष्टाचाराने पोखरले आहे.यामुळे देखील सैन्य दलाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होणार आहे.
7 / 8
अमेरिका आणि चीनमध्ये युद्धाचा अंदाज लावला जात आहे. हे युद्ध पारंपरिक होण्याची शक्यता खूप कमी आहे. यामुळे पेटागॉनच्या रणनितीकारांना मिसाईल आणि बॉम्बपेक्षा चिनी धोक्यांच्या एका मोठ्या श्रृंखलेवर लक्ष केंद्रीत करायला हवे, असा सल्ला या अहवालात दिला आहे. चीन तैवानवर कब्जा करण्याच्या तयारीत आहे, त्यावर लक्ष द्यायला हवे असे यात म्हटले आहे.
8 / 8
रशियन सैन्य देखील आधुनिक शस्त्रास्त्रे असूनही युक्रेनमध्ये जिंकण्यात अयशस्वी ठरली आहेत. इतिहास साक्षी आहे की भल्या भल्या देशांची सैन्य युद्धात आपली अत्याधुनिक शस्त्रा योग्यरित्या वापरण्यात अक्षम ठरली आहेत. चीनदेखील त्यांची शस्त्रे प्रभावीपणे वापरू शकेल का, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली आहे.
टॅग्स :chinaचीनwarयुद्धAmericaअमेरिका