50 वर्षांपासून बंद असलेले घर उघडताच फुटला घाम, समोर आले घरातील फोटोज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 17:49 IST
1 / 10 सोशल मीडियावर अर्बन एक्सप्लोरर एडम मार्कचे इंस्टाग्राम अकाउंट आहे. तो नेहमी ट्रॅव्हल आणि एक्सप्लोरेशनचे व्हिडिओ बनवून यूट्यूबवर अपलोड करत असतो.2 / 10 यूकेचा रहिवासी असलेला अर्बन एक्सप्लोरर एडम मार्क जगभर फिरुन अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घरांचे व्हिडिओ बनवत असतो.3 / 10 काही दिवसांपूर्वी एडमला स्कॉटलँडमधील 50 वर्षांपासून बंद असलेल्या एका बंद घराचा व्हिडिओ बनवण्याची संध मिळाली.4 / 10 मागील पाच दशकांपासून बंद असलेल्या घराचा व्हिडिओ बनवत असताना घरातील दृष्य पाहून एडमला घाम फुटला.5 / 10 एडम मार्कला त्या घरात 1970 चे काही डॉक्युमेंट्स आणि विचित्र गोष्टी दिसल्या. ते घर पाहूनच 70 च्या दशकातील असल्याचे कळत होते. 6 / 10 एडमला त्या घरातील किचनमध्ये एका मांजरीची बॉडी मिळाली, ती बॉडी पाहून एडम जोरात किंचाळला.7 / 10 50 वर्षांपासून बंद असल्यामुळे घराची खूप पडजड झाली होती. पण, एडमला त्या घराच्या डायनिंग एरियाने चकीत केले.8 / 10 डायनिंग डेबलवर मांडलेल्या प्लेट्स पासून, घरातील लोक आताच जेवायला बसणार आहेत, असे वाटत होते.9 / 10 एडमला या बंद घरामध्ये अॅनाबेल चित्रपटातील बाहुलीप्रमाणे एक भीतीदायक बाहुलीही दिसली, तिला पाहून एडमला चांगलाच घाम फुटला.10 / 10 एडम मार्कचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, पण इतके चांगले घर का बंद पडले आहे आणि त्या घरातील लोकांच काय झालं, असा प्रश्न अनेकांना पडलाय.