By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 12:11 IST
1 / 7 नेदरलँडच्या महाराष्ट्र मंडळाने नी अॅम्सटरडॅम जवळील हुफडॉर्प येथे सार्वजनिक गणेशोत्सव दिमाखात साजरा केला. या मंडळाचे यंदाचे हे सहावे वर्ष होते. दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्वांनी गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी केली.2 / 7उत्साहपूर्ण वातावरणात सुंदर गणेश मूर्ती पालखीत ठेवण्यात आली. निशिकांत चौधरी आणि प्रसन्न राव श्रींच्या पालखीचे भोई होते. ढोल ताशा आणि झांजांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. दिनकर माने यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने केलेली मेहनत सर्वांनाचं भावली आणि त्या तालावर सर्वांची पावलं थिरकली.3 / 7गणेशोत्सवादरम्यान शास्त्रीय नृत्यप्रकार, लोकगीते, भारताच्या विविध प्रांतातील नृत्ये, पारंपरिक नऊवारी साडीचे नव्या रुपात दर्शन देणारा फॅशन शो चं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये लहान मुलांसह महिलांनीही मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला होता. 4 / 7जाईली पुराणिक आणि मीनल माने यांनी सूत्रसंचालन केले. शिट्ट्या, टाळ्या आणि वन्समोअरनी सभागृह दणाणून गेले. रिता कोते, वैशाली नार्वेकर ,तेजल नाचणे आणि पूर्वा कोरडे यांनी या कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी खूप कष्ट घेतले.5 / 7सुरेख गुलाबाच्या फुलांच्या सजावटीमध्ये गणराज विराजमान झाले. तसेच श्रींची पूजा आणि मंगल आरती करण्यात आली.6 / 7 चविष्ट भोजन आणि रंगलेल्या गप्पांमुळे उत्सवाला एखादया मेळाव्याचे स्वरूप आले होते.रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात बदल आणि संपूर्ण वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा देणारा हा समारंभ गिरीश कोते यांच्या नेतृत्वाखाली पुष्कर कुलकर्णी,दिनकर माने,स्वप्नील नागमोती आणि मनोज चाकोते या कार्यकारी कमिटीने यशस्वीपणे पार पडला. 7 / 7भारताबाहेर राहूनही आपली सांस्कृतिक नाळ तुटू न देता हा वारसा आपल्या मुलांपर्यंत नेण्याचा आणि सर्व प्रांतीय भारतीयांना एकमेकांशी जोडण्याचा नेदरलँडच्या महाराष्ट्र मंडळाचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी म्हणावा लागेल.