शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात श्रीमंत शहर न्यूयॉर्कमध्ये पुराचा कहर; घरं, गाड्या बुडाल्या पाण्यात, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 12:05 IST

1 / 5
अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील सर्वच भागात मुसळधार पावसामुळे पुराचा कहर पाहायला मिळत आहे. हायलँड फॉल्स, ऑरेंज काउंटी आणि न्यूयॉर्कमध्ये रविवारी (09 जुलै) अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली.
2 / 5
या भागातील पुराचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये पुराचे पाणी घरांमध्ये कसे शिरत आहे, हे दिसून येते. वाहने पाण्यात तरंगताना दिसत आहेत. तसेच, रस्त्यांवरुन पाणी वाहत आहे. न्यूयॉर्कमधील पुराचे फोटो भयानक आहेत.
3 / 5
ऑरेंज काउंटीच्या रहिवासी मेलिसा रॉबर्ट्स यांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये पाण्याचा प्रवाह घरांमध्ये शिरत असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर बाहेरील वाहनेही पाण्यात बुडाली आहेत.
4 / 5
रिपोर्टनुसार, न्यूयॉर्क शहराच्या उत्तरेकडील भागात सुमारे एक फूट (30 सेमी) पाऊस पडला. त्याचबरोबर पावसात अनेक गाड्या वाहून गेल्याच्या घटनाही नोंदवण्यात आल्या आहेत.
5 / 5
याचबरोबर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी अचानक पूरस्थिती लक्षात घेऊन रस्ते बंद केले आहेत. तसेच, लोकांना जास्त उंचीच्या भागात जाण्याचे आणि बोगद्याच्या मार्गाने न जाण्याचे आवाहन केले.
टॅग्स :Americaअमेरिकाfloodपूर