Russia vs Ukraine War: युक्रेन ही तर सुरुवात! पुतीन यांनी रचला मोठा प्लान, रोडमॅप तयार; जगाचं टेन्शन वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 17:45 IST
1 / 10२०१४ मध्ये युक्रेनमध्ये बंड झालं. त्यानंतर स्थानिक बंडखोरांच्या मदतीनं रशियानं क्रिमिया ताब्यात घेतला. त्याचवेळी तिथे जनमत घेण्यात आलं. लोकांनी रशियाच्या बाजूला कौल दिला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी क्रिमिया रशियाला जोडला.2 / 10यानंतर पुतीन यांनी युक्रेनकडे लक्ष वळवलं. वातावरण तयार करण्यासाठी तयारी सुरू झाली. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी अखेर रशियाला आक्रमणाची संधी मिळाली. पुतीन यांनी सैन्याला कारवाईचे आदेश दिले. पुतीन इथंवरच थांबणार नाहीत. आता त्यांची नजर लहान लहान शेजारी देशांकडे आहे. हे देश कधीकाळी सोव्हियत युनियनचा भाग होते.3 / 10२५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत युनियनची शकलं झाली आणि १५ देश तयार झाले. युक्रेन, आर्मिनिया, अजरबैझान, बेलारूस, इस्टोनिया, जॉर्जिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, लॅटविया, लिथुआनिया, मालदोवा, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानची निर्मिती झाली. यापैकी बरेचसे देश हळहळू नाटोचे सदस्य झाले. 4 / 10२००४मध्ये इस्टोनिया, लॅटविया आणि लिथुआनिया नाटोचे सदस्य झाले. २००८ मध्ये जॉर्जिया आणि युक्रेनलादेखील नाटोनं निमंत्रण दिलं होतं. मात्र त्यांना नाटोत सामील होता आलं नाही. युक्रेनमधल्या काही प्रांतांमधील बंडखोरांना रशियानं ताकद पुरवली आहे. त्याच बंडखोरांच्या मदतीनं रशियानं युक्रेनमध्ये आगेकूच केली.5 / 10युक्रेनसारखाच खेळ रशिया जॉर्जियामध्ये खेळणार आहे. इथल्या अबखजिया आणि दक्षिण ओसेटिया भागातील बंडखोरांना रशियानं पाठिंबा दिला आहे. जॉर्जियात मूळ रशियन लोकांचं प्रमाण कमी आहे. मात्र तरीही तिथल्या परिस्थितीवर रशियाचा प्रभाव आहे. 6 / 10२००८ मध्ये रशियानं जॉर्जियावर हल्ला केला. पाच दिवस युद्ध चाललं. तेव्हा जॉर्जियानं पाश्चिमात्य देशांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. रशियानं वारंवार जॉर्जियावर निर्बंध लादले. २०१९ पासून दोन्ही देशांमधील हवाई वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे रशियाचं पुढील लक्ष्य जॉर्जियाच असेल असं जाणकार सांगतात.7 / 10सोव्हियत युनियनमधून बाहेर पडल्यावर लिथुआनियानं सर्वप्रथम स्वातंत्र्य घोषित केलं. युरोपियन युनियनचा सदस्य असलेल्या लिथुआनियाचा समावेश विकसित देशांमध्ये होतो. पुतीन यांच्या निशाण्यावर लिथुआनियादेखील आहे. बाल्टिक देशांवर त्यांचा विशेष राग आहे. हे देश युरोपियन युनियन आणि नाटोचे सदस्य असल्यानं पुतीन यांच्या निशाण्यावर आहेत.8 / 10२०२० मध्ये बेलारुस आणि रशियानं मिळून लिथुआनियावर आक्रमण कसं करायचं याचा अभ्यास केला होता. रशियानं आता युक्रेनवर हल्ला केला आहे. त्यानंतर लिथुआनियानं आणीबाणी घोषित केली आहे. 9 / 10युक्रेन, जॉर्जिया आणि लिथुआनियानंतर रशियाच्या निशाण्यावर मोलदोवा आहे. रशियन भाषा बोलणाऱ्या या देशातील बंडखोर भागात तीन दशकांपासून रशियाधार्जिणं सरकार आहे. मोलदोवाकडे सध्या कोणताही स्पष्ट पर्यायदेखील नाही.10 / 10बेलारुसमधील बहुतांश लोकसंख्या रशियाधार्जिणी आहे. युक्रेन वादात आतापर्यंत बेलारुसनं रशियाला साथ दिली आहे. मात्र आमचं सैन्य हल्ल्यात सहभागी होणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पुतीन यांच्याबद्दल बेलारुसमध्ये सहानुभूती आहे.