शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बुलेट ट्रेन, बोईंग विमानापेक्षा वेगवान, हे तंत्रज्ञान वाहतूक प्रणालीची क्षमता बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 2:30 PM

1 / 10
गेल्या काही दशकांमध्ये तंत्रज्ञानाने आपले जीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित केले आहे. मात्र अद्यापही प्रवासाची पद्धती बऱ्याचअंशी पारंपरिकच राहिली आहे. पण गेल्या काही काळात एक तंत्र खूप चर्चेमध्ये आहे. सार्वजनिक वाहतूक प्रणालीला पूर्णपणे बदलून टाकण्याची क्षमता या तंत्रामध्ये आहे.
2 / 10
या तंत्राचे नाव आहे हायपरलूप. ही एक चुंबकीय कॅप्सुल आहे जी जमिनीवरून काही उंचावरून प्रतितास १२२३ किमी वेगाने हवेत तरंगत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. या कॅप्सूलचा वेग जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन असलेल्या जपानी शिंकासेन ट्रेनपेक्षा ३.५ पट अधिक असेल. याशिवाय ही हायपरलूप बोईंग ७४७ विमानापेक्षाही अधिक वेगवान असेल.
3 / 10
अॅलन मस्क यांनी २०१३ मध्ये ५८ पानांचा हायपरलूप अल्फा नावाचा रिसर्च पेपर लिहिल्यावर हायपरलूप ही कल्पना सर्वप्रथम चर्चैत आली होती. या पेपरमध्ये त्यांनी डिझाइन, खर्च आणि कॉन्सेप्टच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर लिखाण केले होते. मात्र मस्क स्वत: या कल्पनेवर काम करत नाही आहेत.
4 / 10
व्हर्जिन हायपरलूप आणि हायपरलूप टीटी या दोन कंपन्या हायपरलूपची कल्पना सत्यात उतरवण्यासाठी काम करत आहे. व्हर्जिन हायपरलूपने प्रवाशांसोबत टेस्ट रनसुद्धा घेतली आहे. २०२० च्या अखेरीस या कंपनीने लास वेगास ते नेवाडादरम्यान यशस्वी चाचणी घेतली होती. या प्रवासामध्ये कंपनीचे सहसंस्थापक जोश गिगल आमि हेड ऑफ पॅसेंजर एक्सपिरियन्स सारा लुशियन सहभागी झाल्या होत्या.
5 / 10
या फ्युचरिस्टिक तंत्राचा हेतू दोन शहरांमधील प्रवासाचा दर्जा वाढवणे हा आहे. या तंत्रज्ञानामुळे विमानाच्या तुलनेत कमी प्रदूषण होईल. त्याशिवाय प्रवासामध्ये वेळही कमी लागेल. त्यामुळे अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला चालना देण्याची शक्यता वाढेल. मात्रा या प्रकल्पामध्ये आर्थिक खर्च आणि पर्यावरण संवर्धन ही मोठी आव्हाने आहेत.
6 / 10
हायपरलूप ही पारंपरिक रेल्वेपेक्षा दोन बाबतीत वेगळी आहे. एक म्हणजे हायपरलूप पॉड्स अंडरग्राऊंड ट्युबमधून धावतील आणि घर्षण कमी व्हावे म्हणून या ट्यूबमधून हवा बाहेर काढली जाईल. त्यामुळेच हे पॉड्स ७५० मैल प्रतितास म्हणजेच सुमारे १२२३ किमी प्रतितास वेगाने धावेल.
7 / 10
याशिवय ट्रेन किंवा कारप्रमाणे चाकांवर धावण्याऐवजी हे पॉड्स जमिनीपासून थोडे वर हवेत तरंगतील. तसेच घर्षण कमी करण्यासाठी या पॉड्समध्ये मॅग्नेटिक लेविटेशनचा वापर केला जाईल. मॅग्नेटिक लेविटेशनचे तंत्र हायपरलूपच्या ग्रोथच्या हिशेबाने सर्वात महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.
8 / 10
मात्र हायपरलूपच्या टीकाकारांच्या मते अधिकच्या जी-फोर्समुळे लोकांमध्ये अस्वस्थता आणि घाबरण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तर समर्थक सांगतात की, यामधून प्रवास करणे हे लिफ्ट किंवा पॅसेंजर प्लेनमधून प्रवास करण्यासारखेच असेल.
9 / 10
गिगेल सांगतात की, व्हर्जिन हायपरलूप भारतामध्ये पॅसेंजर रुट्स तयार करण्याचा विचार करत आहे. येथील वाहतूक प्रणाली खूप गर्दी असलेली आहे. त्याशिवाय अशाच प्रकारचे पॅसेंजर रुट्स सौदी अरेबियामध्ये बनवण्याची तयारी सुरू आहे. लाखो लोकांनी या क्रांतिकारी तंत्राचा फायदा घ्यावा, असा आमचा प्रयत्न आहे.
10 / 10
रिपोर्ट्सनुसार या तंत्रामधून लंडन ते पॅरिस हे अंतर केवळ अर्ध्या तासात तर लॉस एंजलिसमधून सॅन फ्रान्सिस्कोमध्ये केवळ ४५ मिनिटांमध्ये पोहोचता येईल. हे तंत्रज्ञान पुढच्या काही वर्षांत प्रत्यक्ष सेवे येण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Hyperloopहायपर लूपInternationalआंतरराष्ट्रीयbusinessव्यवसाय