शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

US Election 2020 : निवडणूक अमेरिकेची, पण पनीर टिक्का ट्रेंडमध्ये; भारतीय महिला नेत्याचे झाले हसू

By हेमंत बावकर | Published: November 03, 2020 7:50 PM

1 / 10
अमेरिकेत आज राष्ट्राध्य़क्ष निवडणूक होत आहे. यामध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भविष्य ठरणार आहे. पण आज दिवसभर अमेरिकेत निवडणुकीमध्ये पनीर टिक्का ट्रेंडमध्ये (Paneer Tikka) होता. युजर एवढे हैराण झाले होते की त्यांनाही काहीच समजेना.
2 / 10
त्याचे झाले असे की, या लज्जतदार डिशचा तसा काही अमेरिकेच्या निवडणुकीशी संबंध नाही. मात्र, डेमोक्रेटिक पार्टीच्या अनिवासी भारतीय खासदार प्रमिला जयपाल यांचे एक ट्विट पनीर टिक्का ट्रेंडमध्ये येण्यास कारण ठरले.
3 / 10
मतदानाच्या आदल्या रात्री प्रमिला जयपाल यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या सन्मानार्थ एक खास डिश बनविण्याचा निर्णय घेतला होता.
4 / 10
यानुसार त्यांनी पनीर टिक्काला पसंती देत बनविला. महत्वाचे म्हणजे हॅरिस यांच्या पतीने काही दिवसांपूर्वीच पत्नीचा आवडता पदार्थ पनीर टिक्का असल्याचे म्हटले होते.
5 / 10
55 वर्षांच्या प्रमिला जयपाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, आज रात्री कमला हॅरिस यांच्या सन्मानार्थ मी पनीर टिक्का बनविला आहे. कारण त्यांनी इन्स्टावर तसे सांगितले होते. तसेच अमेरिकेच्या नागरिकांनी बायडन-हॅरिस यांना मतदान करण्याचे आवाहन करताना हॅशटॅग बायडन-हॅरिस 2020 देखील जोडला.
6 / 10
यानंतर प्रमिला जयपाल यांनी ट्विटरवर नॉर्थ इंडियन डिशचा फोटो शेअर केला. तसेच तो कसा बनवला याची रेसिपी शेअर केली.
7 / 10
तुम्ही पनीर टिक्का हा असाही खाऊ शकता किंवा त्यामध्ये मसालाही टाकू शकता. हा मसाला एका करीसारखा आहे, एन्जॉय!, असे त्यांनी म्हटले आणि अडचणीत आल्या.
8 / 10
पनीर टिक्का बनविण्याचा हा प्रकार काही नेटकऱ्यांना रुचकर लागला नाही. काही युजरनी हा भारतीय पनीर टिक्का अजिबात दिसत नाही, कारण तो ग्रेव्हीसह वाढला जात नाही, असे म्हटले. तर काही जणांनी खिल्ली उडविली.
9 / 10
एका युजरने तर म्हटले की, प्रमिला ने मलई पनीर ऑर्डर केला आहे, त्यालाच त्या पनीर टिक्का सांगत आहेत. त्यांनी हा बनविलेला नाही, यामुळे त्यांना ही डिशे कोणती हे सांगता येत नाहीय, असे सांगत खिल्ली उडविली.
10 / 10
कमला हॅरिस आणि प्रमिला जयपाल या मुळच्या चेन्नईच्या आहेत. प्रमिला यांचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला आहे. त्या वयाच्या 16 व्या वर्षी 1982 साली अमेरिकेला गेल्या आहेत. कमला हॅरिस यांची आई चेन्नईमध्ये जन्मली होती. त्या 19 व्या वर्षी अमेरिकेला गेल्या होत्या.
टॅग्स :AmericaअमेरिकाKamala Harrisकमला हॅरिसUS ElectionAmerica Election