शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बर्गर खा, पण आमचा नको; बर्गरकिंग ग्राहकांना सांगतेय मॅकडोनाल्डकडे जा!

By हेमंत बावकर | Published: November 04, 2020 2:14 PM

1 / 10
जगभरात कोरोना महामारीमुळे लोकांचे आयुष्यच रुळावरून घसरलेले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हजारोंच्या संख्येने कंपन्या, उद्योगांना टाळे लागले आहे. यामुळे काही कोटींमध्ये लोक बेरोबजगार झाले आहेत. नोकरी गमावलेल्यांना दोन वेळच्या जेवनाची भ्रांत जाणवू लागली आहे.
2 / 10
बऱ्याचठिकाणी लॉकडाऊन हटविण्यात आल्याने आता कुठे हळूहळू सुरळीत होऊ लागले आहे. अशा काळात लोक एकमेकांना मदत करू लागले आहेत. या कोरोनाकाळात काही चांगल्या गोष्टीही प्रकाशात आल्या आहेत.
3 / 10
आश्चर्याची बाब म्हणजे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या बर्गरकिंगने चक्क मॅकडोनाल्डचा बर्गर मागविण्याची विनंती आपल्या ग्राहकांना केली आहे. यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर बर्गरकिंगची सोशल मीडियावर स्तुती सुरु केली आहे.
4 / 10
व्यापारात प्रत्येकजण आपले वर्चस्व जमविण्याचा प्रयत्न करत असतो. दुसऱ्याची विक्री कशी कमी होईल आणि आपली कशी जास्त होईल याकडे सर्वच कंपन्या किंवा दुकानदारांचे लक्ष असते. सहाजिकच आहे प्रत्येकाला फायदा आणि प्रगतीची ओढ असते.
5 / 10
अशा स्पर्धेच्या आणि अस्तित्व टिकविण्याच्या काळात बर्गर किंगने आपल्या ग्राहकांना मोठा प्रतिस्पर्धी मॅकडोनाल्डचा बर्गर मागविण्यास सांगितल्याने खळबळ उडाली होती. लोकांना विश्वासही बसत नव्हता.
6 / 10
बर्गर किंगने युरोपमध्ये 2 नोव्हेंबरला हे ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी असे म्हटले की, आम्ही कधी विचारही केला नव्हता की एक दिवस आम्ही तुम्हाला हे करण्यास सांगू. आम्ही कधीही विचार केला नव्हता की पिझ्झा हट, केएफसी, डॉमिनोज, मॅकडोनाल्ड सारख्या दुसऱ्या फास्टफूड चेनकडून खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यास सांगू. मात्र, जगभरात वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या हजारो लोकांना तुमच्या मदतीची गरज आहे.
7 / 10
कोरोना संकटामुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. आयुष्य आता पहिल्यासारखे राहिलेले नाही. प्रत्येक क्षेत्रात परिणाम झाले आहेत. मात्र, पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्र अधिक प्रभावित झाले आहे. भारतासह जगभरात अनलॉक कारण्यात येत असले तरीही सारे मूळ जागेवर येण्यास वेळ लागणार आहे.
8 / 10
बर्गरकिंगचे हे आवाहन अशावेळी आले आहे, जेव्हा युरोपमध्ये कोरोना वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन सुरु करण्यात येत आहे. या आवाहनानंतर जगभरातील लोकही भावूक झाले आहेत.
9 / 10
कारण यामध्ये बर्गरकिंगने स्वत:च्या अस्तित्वाचा विचार न करता प्रतिस्पर्धी कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचा विचार केला आहे.
10 / 10
युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे बहुतांश देशांनी पुन्हा लॉकडाऊन करण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम लोकांच्या अर्थाजनावर होणार आहे.