शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Donald Trump's Visit : अमेरिकेत पोहोचल्यावर इवांका ट्रम्प यांनी भारत दौऱ्याबाबत दिली अशी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 20:29 IST

1 / 12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आले होते. अमेरिका आणि भारत यांच्यात होणाऱ्या सुरक्षा करारासाठी त्यांचा हा दौरा होता. ट्रम्प यांच्यासोबत पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका आणि जावईदेखील होते.
2 / 12
भारत-अमेरिका यांच्यात झालेल्या विविध करारांना अंतिम स्वरुप देण्यात त्यांची कन्या इवांका यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागार आहेत.
3 / 12
भारत दौऱ्यानंतर इवांका अमेरिकेला परतल्या आहेत. अमेरिकेमध्ये गेल्यावर त्यांनी भारतात घालवलेले सुंदर क्षण आणि फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 12
भारत दौऱ्यादरम्यान करण्यात आलेल्या उत्तम आदरातिथ्याबद्दल इवांका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
5 / 12
ताजमहाल पाहिल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. भारताकडून झालेला पाहुणचार मनाला भावला असल्याने पुन्हा ताजमहाल पाहण्यासाठी येऊ असं त्यांनी सांगितलं.
6 / 12
ट्रम्प कुटुंबाने आग्रा येथील ताजमहाल येथे भेट दिली. इवांका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ताजमहालसमोरचा पतीसोबत हातात हात घेतलेला सुंदर फोटो ट्विट करत भारताचे आभार मानले आहेत.
7 / 12
सध्या इवांका यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. इवांका यांच्या फिटनेसपासून त्यांनी घातलेल्या ड्रेसचीही चर्चा होत आहे.
8 / 12
Thank you India! असं ट्विट इवांका यांनी केलं आहे. इवांका ताजमहालच्या प्रेमात पडल्या. पती जेरेडसोबत त्यांनी मनसोक्त फोटो काढले आहेत.
9 / 12
मंगळवारी ट्रम्प दाम्पत्यासह इवांका आणि त्यांचे पती जेरेड कुशनेर हे राष्ट्रपती भवनात आले. त्यानंतर राजघाट आणि हैदराबाद हाऊस असा राष्ट्राध्यक्षांचा कार्यक्रम होता.
10 / 12
ताजमहाल भेटीवेळी इवांकाने गाईडला अनेक प्रश्न विचारले, त्यानंतर ताजमहालला पुन्हा येण्याची इच्छाही व्यक्त केली. पती जेरेडसोबत इवांका यांनी खूप फोटो काढले.
11 / 12
मंगळवारी (25 फेब्रुवारी) इवांका यांनी शेरवानी परिधान केली होती. ही शेरवानी प्रसिद्ध भारतीय फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांनी डिझाईन केली होती.
12 / 12
मंगळवारी (25 फेब्रुवारी) इवांका यांनी शेरवानी परिधान केली होती. ही शेरवानी प्रसिद्ध भारतीय फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांनी डिझाईन केली होती.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी