शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Elon Musk: एलन मस्क विरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले; दिसेल तिथं टेस्ला कार पेटवल्या, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 12:23 IST

1 / 10
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे खास असलेले प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अमेरिकेच्या सरकारमध्ये दक्षता विभागाचे प्रमुख पद सांभाळणारे मस्क यांच्याविरोधात जगभरात विरोध प्रदर्शन सुरू आहे.
2 / 10
शनिवारी हजारो लोक रस्त्यावरून उतरून एलन मस्क यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते. या काळात लोकांनी टेस्ला कारला आग लावण्याचं काम केले. टेस्ला कंपनीची वाहने जिथे दिसेल तिथे लोकांकडून पेटवण्यात आल्या. यात बऱ्याच कार जळून खाक झाल्या.
3 / 10
फक्त अमेरिकेतच नव्हे तर ब्रिटन, जर्मनीसारख्या देशातही मस्क यांच्याविरोधात लोकांनी नाराजी व्यक्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, DOGE प्रमुख म्हणून मस्क यांनी आखलेल्या धोरणाविरोधात विरोध करण्यासाठी लोकांनी आंदोलनाचं पाऊल उचलले आहे.
4 / 10
मस्क यांनी या विभागाचे कामकाज सांभाळताना संवेदनशील माहिती मिळवली आणि सरकारी खर्च कपात करण्याच्या बहाण्याने अनेक एजन्सी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यातून कित्येक लोक बेरोजगार झाले. लाखो कुटुंबावर ट्रम्प यांच्या धोरणाचा परिणाम झाला.
5 / 10
एलन मस्क यांच्या निर्णयाविरोधात अनेकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे लोक आता रस्त्यावर उतरून मस्क यांच्या संपत्तीला टार्गेट करत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेले एलन मस्क यांच्या ३४० बिलियन डॉलर संपत्तीत सर्वात मोठा हिस्सा टेस्ला कंपनीचा आहे.
6 / 10
शनिवारी अमेरिकेतली मेंटेस्ला येथे सर्व २७७ शोरूम आणि सेंटरबाहेर लोकांचा जमाव जमला. टेक्सास, न्यूजर्सी, मॅसाचुसेट्स, कनेक्टिकट, न्यूयॉर्क, मिनेसोटा आणि अमेरिकेच्या अनेक भागात टेस्ला डिलरशिप ठिकाणी लोकांच्या जमावाने मस्क यांच्याविरोधात आंदोलन केले.
7 / 10
आंदोलनाशी निगडीत अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. ज्यात टेस्ला जाळा, लोकशाही वाचवा, अमेरिकेला मस्कपासून मुक्त करा अशा घोषणा देत आहेत. शिकागो येथे शोरूम बाहेर संतप्त आंदोलकांनी मस्क यांच्या हकालपट्टीची मागणी केली.
8 / 10
अमेरिकेत याआधीही टेस्ला वाहनांना टार्गेट करण्यात आले होते. असा हल्ला करण्याचा मुर्खपणा बंद करावा असं मस्क यांनी म्हटलं होते. तर डोनाल्ड ट्रम्प यांनीही मस्क यांची पाठराखण करत टेस्ला वाहनांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करू, त्यांना २० वर्ष जेलमध्ये पाठवू असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.
9 / 10
दरम्यान, वाढत्या विरोधानंतर एलन मस्क हे ट्रम्प यांची साथ सोडण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी दिलेले डिपार्टमेंट ऑफ गर्व्हनमेंट एफिशिएंसी(DOGE) हे पद मस्क सोडणार आहेत.
10 / 10
मस्क यांच्या या निर्णयामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना झटका बसणार आहे. मस्क यांनी हा निर्णय अशावेळी घेतला आहे जेव्हा अमेरिकेचे नुकसान १ ट्रिलियन डॉलरपर्यंत कमी करण्याचं लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होती.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पelon muskएलन रीव्ह मस्कAmericaअमेरिकाTeslaटेस्ला