Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 12:59 IST
1 / 7अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह काही देशांवर प्रचंड टॅरिफ लावला आहे. रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आणि टॅरिफ युद्ध भडकले. 2 / 7डोनाल्ड ट्रम्प, नाटोच्या महासचिवांसह इतर नेत्यांकडूनही भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, असा दबाव टाकला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर रशियाने अमेरिकेला खडेबोल सुनावले आहेत.3 / 7रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी स्पष्ट शब्दात अमेरिकेची कानउघाडणी केली आणि आम्ही टॅरिफ लावू अशा धमक्या आता चालणार नाहीत. भारत आणि चीनला धमक्या देऊन काहीही होणार नाही, असे सुनावले आहे.4 / 7परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी रशियातील चॅनेल१ वृत्तवाहिनीच्या द ग्रेट गेम कार्यक्रमात बोलताना टॅरिफ आणि अमेरिकेच्या भूमिकेवर टीका केली. भारत आणि चीन हे प्राचीन संस्कृती असलेले देश आहेत. त्यांना आम्हाला आवडत नाही म्हणून ते करणे थांबवा असे करता येणार नाही, अशा आशयाचं विधान त्यांनी केलं.5 / 7सर्गेई लावरोव्ह म्हणाले, 'चीन आणि भारत हे दोन्ही देश प्राचीन संस्कृती असणार आहेत. त्यांच्याशी आम्हाला जे आवडत नाही, ते करणं थांबवा अन्यथा आम्ही तुमच्यावर टॅरिफ लावू, हे आता कामी येणार नाही.'6 / 7'सध्या वॉशिंग्टन ते बीजिंगमध्ये (अमेरिका आणि चीन), नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन (भारत आणि अमेरिका) यांच्यात संवाद सुरू झाला असून, त्यावरून हेच लक्षात येतंय की धमक्या आता काम करणार नाही, हे अमेरिकेच्याही लक्षात आलं आहे', असेही लावरोव्ह म्हणाले.7 / 7रशियाने ही भूमिका मांडण्याच्या काही तास आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी मी भारताच्या खूप जवळ आहे. पंतप्रधान मोदींच्याही खूप जवळ आहे. आमच्यामध्ये खूप चांगले संबंध आहेत', असे म्हटले आहे. 'खूप गोष्टी करण्यात तयार आहे, पण मी ज्यांच्यासाठी लढत आहे, त्याचवेळी हे (चीन, भारत) रशियाकडून तेल खरेदी करत आहेत', असेही ट्रम्प म्हणाले आहेत.