शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 17:07 IST

1 / 11
2 / 11
नास्तिक लोकांचं प्रमाण सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे. चीनमधील ९१ टक्के लोकसंख्या कुठल्याही देव किंवा धर्मावर विश्वास ठेवत नाही. चिनी समाजामध्ये कन्फ्युशियस, ताओवाद आणि बौद्ध धर्म प्रचलित आहेत. मात्र ते कुठल्याही वैयक्तिक देवतेवर विश्वास ठेवत नाहीत. त्याशिवाय १९४९ मध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट पक्ष सत्तेवर आला. हा पक्ष नास्तिकतेचं समर्थन करतो. त्यामुळे चीनमध्ये नास्तिकांची संख्या झपाट्याने वाढली.
3 / 11
पूर्व आशियातील जपानमध्ये नास्तिक आणि कुठलाही धर्म न मानणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जपानमध्ये काही पारंपरिक धार्मिक रीतीपरंपरा आहेत. त्यामध्ये शिंटोवाद आणि बौद्ध धर्म प्रमुख आहेत. मात्र तरीही येथे नास्तिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या जपानमध्ये ८६ टक्के लोक कुठलाही धर्म न मानणारे आहेत.
4 / 11
युरोपमधील स्विडन या देशामध्येही नास्तिक लोकांचं प्रमाण अधिक आहे. येथील लोक स्वत:ची ओळख नास्तिक म्हणून करून देतात. स्विडनमध्ये कुठलाही धर्म न मानणाऱ्या नास्तिकांची संख्या ७८ टक्के आहे. येथे धर्म हा बहुतांशी खाजगी स्वरूपाचा आहे.
5 / 11
झेक प्रजासत्ताक या युरोपीयन देशामध्येही नास्तिक लोकांची संख्या अधिक आहे. देशातील सुमारे ७५ टक्के लोकसंख्या ही बिगरधर्मीय आहे. तसेच बहुतांश लोक आपली ओळख नास्तिक म्हणून करून देतात. झेक प्रजासत्ताक हा देश बरीच वर्षे साम्यवादी सरकारच्या अधीन होता. त्या काळात येथे धर्माचं बऱ्यापैकी दमन करण्यात आलं.
6 / 11
नास्तिक देशांच्या यादीमध्ये ब्रिटनचाही क्रमांक बराच वरचा आहे. कधीकाळी ख्रिस्ती देश म्हणून ब्रिटनची ओळख होती. मात्र सद्यस्थितीत ब्रिटनमधील ७२ टक्के लोक हे कुठलाही धर्म मानत नाहीत. गेल्या काही काळात धर्मनिरपेक्षता हे तत्त्व या देशात कमालीचं प्रभावी झालं आहे.
7 / 11
इस्टोनिया या देशाचा युरोपमधील सर्वाधिक धर्मनिरपेक्ष असलेल्या देशांपैकी एक आहे. येथील बहुतांश लोक आपली ओळख निधर्मी म्हणून करून देतात. या देशामधील ७२ टक्के लोक कुठल्याही धर्माचं पालन करत नाहीत. सोव्हिएत सरकारच्या काळात येथून धर्माचं मोठ्या प्रमाणावर उच्चाटन करण्यात आलं.
8 / 11
बेल्जियममध्येही गेल्या काही वर्षांपासून निधर्मी लोकांचं प्रमाण वाढत आहे. येथील धर्मनिरपेक्षथा आता हळुहळू नास्तिकतेकडे वळत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या कॅथलिक देश असला तरी आधुनिकीकरणामुळे येथील धर्माची पकड सैल होत गेली आहे. सध्या बेल्जियममधील ७२ टक्के लोकसंख्या ही निधर्मी आहे.
9 / 11
गेल्या काही दशकांमध्ये ऑस्ट्रेलियातही नास्तिकतेचं प्रमाण वाढलं आहे. तरुण पिढीमध्ये धर्माबाबत असलेली आवड कमी झाली आहे. तसेच चर्चमध्ये नियमितपणे जाणाऱ्या लोकांची संख्या रोडावली असून, स्वत:ला निधर्मी म्हणवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ऑस्ट्रेलियातील सुमाने ७० टक्के लोकसंख्या ही निधर्मी आहे.
10 / 11
नॉर्वे हा युरोपमधील धर्मनिरपेक्ष देशांपैकी एक असून, येथील बहुतताश लोकसंख्या ही निधर्मी आणि नास्तिक आहे. गेल्या काही दशकांपासून नॉर्वेमध्ये लोकांच्या जीवनावर असलेला धर्माचा प्रभाव कमालीचा घटला आहे. येथे नास्तिकांची संख्या ७० टक्के एवढी आहे.
11 / 11
डेन्मार्कसुद्धा जगातील सर्वाधिक धर्मनिरपेक्ष असलेल्या देशांपैकी एक असून, देशातील ६८ टक्के लोक हे स्वत:ला निधर्मी म्हणवून घेतात. ऐतिहासिकदृष्ट्या हा देश लिथुआनियन चर्चशी संबंधित आहे. मात्र हल्लीच्या काळात या देशावरील धर्माचा प्रभाव कमी झाला आहे.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयchinaचीनAustraliaआॅस्ट्रेलियाJapanजपान