शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारताबरोबर 'या' देशांमध्येही साजरी केली जाते दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 23:19 IST

1 / 5
देशभरात दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. प्रत्येकाचं घरं दिव्यांनी उजळून निघालं आहे. परंतु भारतातच नव्हे तर इतर देशांतही दिवाळी साजरी केली जाते. फक्त त्या देशांनुसार त्यांना वेगवेगळी नावं देण्यात आली आहेत. इंग्लंडमध्ये 4 किंवा 5 नोव्हेंबरला बोनफायर नाइट साजरी केली जाते. या रात्रीत दुकानं, घरं यांना प्रकाशमय करण्यात येते.
2 / 5
चीनमध्ये दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो. अनेक जण या सणांना लालटेन पेटवून हवेत सोडतात.
3 / 5
दिवाळी हा सण यहुदी लोकही साजरा करतात. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांतून आठ दिवस साजरा करतात.
4 / 5
फ्रान्समधल्या ल्योन शहरातही फेस्टिव्हल ऑफ लाइट्स साजरा केला जातो. चार दिवसांचा हा सण 6 डिसेंबरपासून 9 डिसेंबरपर्यंत चालतो.
5 / 5
स्पेनच्या वेलेन्सिया शहरातही दिवाळी सेलिब्रेट केली जाते. फ्लास हा लॅटिन शब्द फॅक्सपासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ टॉर्च आहे. या सणाला प्रत्येक घराघरांत दिव्याची रोषणाई केली जाते.