डझनभर अपघात, अनेक त्रुटी तरी डोनाल्ड ट्रम्प भंगार लढाऊ विमान भारताच्या गळ्यात मारू इच्छितायत; मस्कनी देखील धिक्कारलेले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 14:24 IST
1 / 12अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात येण्यासाठी निघाले आहेत. ही भेट अनेक गोष्टींसाठी यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. परंतू, एक गोष्ट अशी आहे जी भारतासाठी धोक्याची ठरू शकते. ती म्हणजे अमेरिकेचे खतरनाक मानले जाणारे नव्या पिढीचे F-35 स्टील्थ फायटर विमान. हे विमान भारतातही आलेले आहे. बंगळुरूच्या एअरोशो मध्ये रशियाचे आणि अमेरिकेचे पाचव्या पिढीचे लढाऊ विमान आले आहे. या दोघांच्याही तुलनेत रशियाचे विमान उजवे असताना तिकडे ट्रम्प यांनी मोदींना अमेरिकेचे लढाऊ विमान विकत घेण्याची ऑफर दिली आहे. 2 / 12अमेरिकेचे एफ-३५ हे लढाऊ विमान एवढे धोकादायक आहे की त्याला खुद्द एलन मस्क यांनी महागडे ठरणारे भंगार अशी उपमा दिली आहे. तेच विमान डोनाल्ड ट्रम्प भारताच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करत आहेत. अगदी पंधरा दिवसांपूर्वी अलास्कामध्ये हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. एवढेच नाही तर २०१८ पासून सुमारे १२ विमाने अपघातग्रस्त झाली आहेत. या विमानात एवढ्या त्रुटी आहेत की दुरुस्त करून करून भारताचा खजिना रिता होऊ शकतो. या विमानात एकूण ६५ त्रुटी आहेत. 3 / 12एफ-३५ लाइटनिंग II हे अमेरिकन एरोस्पेस लॉकहीड मार्टीनने विकसित केलेले आहे. २००६ मध्ये पहिल्यांदा या विमानाचे उड्डाण झाले होते. तुलनेने जड असलेल्या या विमानाला शॉर्ट-विंग डिझाइन आहे. या विमानाच्या डिझाईनमध्येच मोठी समस्या असल्याचे ट्रम्प यांचा दावा आहे. तसेच हे विमान एवढे महागडे आहे की ते पडले की अमेरिकेला 694 ते 1303 कोटींचे नुकसान होते. 4 / 12हे विमान अमेरिकेसाठीच पांढरा हत्ती ठरलेले आहे. हे लढाऊ विमान सर्व प्रकारच्या हवामानात वापरता येते. इलेक्ट्रॉनिक वॉर, हेरगिरी, पाळत ठेवणे, गुप्तचर अशा अनेक जोखमीच्या मोहिमा हे विमान पार पाडते. 5 / 12या विमानाचा वेग 1976 KM प्रति तास आहे. तर एकदा उड्डाण केले की ते विमान १२३९ किमीपर्यंत उड्डाण करू शकते. तसेच जास्तीतजास्त ५० हजार फुटांवर जाऊ शकते. या विमानावर ४ बॅरलची गोल फिरणारी गन आहे ती एका मिनिटाला १८० गोळ्या डागू शकते. 6 / 12या विमानाला चार आत आणि बाहेर सहा हार्डपॉईंट्स म्हणजेच १० मिसाईल जोडण्याचे पॉईंट्स आहेत. हे विमान हवेतून जमीन, समुद्र आणि जहाजांवर देखील मारा करू शकते. लपून वार करण्याची या विमानाची खासियत आहे. 7 / 12विमानाची बांधणी, त्याची जटिलता या विमानाची प्रमुख समस्या आहे. अनेक महत्त्वाच्या प्रणाली वारंवार बिघाडत असतात. हे विमान मोठ्या प्रमाणात डेटावर प्रक्रिया करते. यामुळे या विमानाचे पायलटही थकून जातात. 8 / 12२०२० मध्ये एअरबेसच्या धावपट्टीवर उतरताना हे विमान कोसळले होते. ऑक्सिजन सिस्टीममधील डिझाइन, हेड-माउंटेड डिस्प्लेमध्ये बिघाड आणि फ्लाइट कंट्रोल सिस्टिमध्ये बिघाड झाल्याने पायलटचा जीव धोक्यात आला होता. 9 / 12खुद्द पेंटागॉननेच या विमानाला भंगार श्रेणीत टाकले होते. हे लढाऊ विमान त्याच्या ऑपरेशनल क्षमता पूर्ण करू शकत नाही, असा शेराच त्यांनी ओढला होता. ६५ ऑपरेशनल त्रुटी असल्याचे त्या अहवालात नमूद करण्यात आले होते. 10 / 12एवढेच नाही तर यूएस गव्हर्नमेंट अकाउंटेबिलिटी ऑफिसने देखील यूएस एअर फोर्सच्या F-35 फ्लीटपैकी अर्ध्याहून अधिक विमाने उड्डाणास लायक नसल्याचे आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले होते. तसेच हे विमान एकदा नादुरुस्त झाले की अमेरिकेलाच ते दुरुस्त करण्यासाठी १७२ दिवस लागत असल्याचे त्यांनी नमूद केले होते. 11 / 12एवढ्या समस्या असल्या तरीदेखील अनेक देशांना १००० हून जास्त विमाने विकण्यात आली आहेत. या कंपन्यांचा अमेरिकन सरकारवर मोठा दबाव असतो. त्यात नेत्यांचेही पैसे गुंतलेले असतात. यामुळे अमेरिकी सरकार आपल्या प्रभावाचा वापर करून ही विमाने इतर देशांच्या गळ्यात मारते. 12 / 12अमेरिकेने काही वर्षांपूर्वी त्यांची एअर डिफेन्स सिस्टिम थाड विकत घेण्यासाठी भारतावर दबाव वाढविला होता. परंतू भारताने रशियाची एस-४०० विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. आताही तीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. अमेरिकेपेक्षा रशियाचे पाचव्या पिढीचे विमान खूप चांगले आहे.