11 वर्षांपासून नदी पोहून पार करतो; ऑफिसला जाण्यासाठी 30 मिनिटे वाचवतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 11:29 IST
1 / 6दोन शहरांमध्ये नदी असेल आणि जर ट्रेनने ऑफिसला जाण्यासाठी तुम्हाला 1 तास लागत असेल तर ती नदी पोहून 30 मिनिटे वाचवाल का? नाही ना. पण चीनमधील एक व्यक्ती असा आहे जो गेली 11 वर्षे नदी पोहून पार करत ऑफिसला जातो. 2 / 6चीनच्या यांग्टजी नदीमुळे झू बीवू यांना 1 तासाचा ट्रेनने प्रवास करावा लागतो. शिवाय नंतर वाहतुकीची समस्या वेगळीच. या पासून वाचण्यासाठी बीवू हे रोज 2.2 किमीची नदी पोहून पार करतात आणि ऑफिसला जातात. महत्वाचे म्हणजे ते हे अंतर अवघ्या 30 मिनिटांत कापतात. 3 / 6झू हे हेनयांग जिल्ह्यामध्ये राहतात. ते वुचांग शहरातील एका फूड मार्केटमध्ये मॅनेजर म्हणून काम पाहतात. झू यांनी मिडियाला सांगितले की ते केवळ वेळ वाचविण्यासाठी नागी तर आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नदी पोहून पार करतात. 4 / 6झू हे सकाळी 7 वाजता नदी किनारी पोहोचतात. बूट व अन्य कपडे काढून ते एका वॉटरप्रूफ बॅगेमध्ये ठेवतात. यानंतर नदीत उडी मारून पलीकडे पोहोचतात. नदी पार केल्यानंतर ते तयार होऊन ऑफिसला जातात. 5 / 61999 मध्ये त्यांचे वजन 100 किलो पेक्षा जास्त होते. तसेच त्यांना टाईप-2 मधुमेह होता. मात्र, आता त्यांचे वजन आणि मधुमेह दोन्ही सामान्य स्तरावर आहेत. 6 / 62004 पासून झू यांनी पोहायला सुरुवात केली. त्यांनी यासाठी प्रशिक्षणही घेतले. 2008 मध्ये त्यांनी हिवाळी स्विमिंग इव्हेंट्समध्ये भाग घेतला. यानंतर त्यांनी पोहून ऑफिसला जाण्यास सुरुवात केली.