शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : धक्कादायक! केवळ एका तरूणीमुळे 5 हजार लोकांना कोरोनाची लागण, देशभरात पसरला व्हायरस!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 9:05 AM

1 / 10
कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. जगभरातील हजारो लोक आतापर्यंत मृत्यूमुखी पडले आहेत. अनेकजण या आजारापासून बचाव करण्यासाठी घरात थांबले आहेत तर काही लोक अजूनही या व्हायरसकडे गंभीरतेने बघत नाहीयेत.
2 / 10
काही लोकांच्या बेजबाबदारपणामुळे हा व्हायरस वाढत आहे. अशीच एक घटना साउथ कोरियातून समोर आली आहे. इथे एका तरूणीच्या हलगर्जीपणामुळे हजारो लोक कोरोना व्हायरसचे शिकार झाले आहेत, असा दावा करण्यात आला आहे.
3 / 10
honknews.com ने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियातील वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरस कसा पसरला याची तपासणी केली. त्यांना आढळले की, कशाप्रकारे एका तरूणीच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या देशात हजारो लोकांना कोरोनाची लागण झाली.
4 / 10
aajtak.intoday.in ने दिलेल्या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, एक संक्रमित तरूणी सकाळी साउथ कोरियातील शेचोंची चर्चमध्ये गेली होती. त्यानंतर ही तरूणी 6 फेब्रुवारीला एका छोट्या अपघातामुळे हॉस्पिटलमध्ये गेली.
5 / 10
इथे तिला हलका ताप असल्याचं आढळून आलं. पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. याच हॉस्पिटलमध्ये 119 लोक कोरोनाचे शिकार झाल्याचे समोर आले. हे सगळं इथेच थांबलं असं नाही.
6 / 10
14 फेब्रुवारीला म्हणजे व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी ही तरूणी क्वीन व्हॅल हॉटेलमध्ये जेवण करायला गेली होती. इथेही तिच्यामुळे काही लोक कोरोनाचे शिकार झाले. अशाप्रकारे हा व्हायरस संपूर्ण साउथ कोरियामध्ये पसरत आहे आणि कुणाला याची कानोकान खबरही नाही.
7 / 10
साउथ कोरियाची राजधानी सोलमध्ये ज्या तरूणीला कोरोनाची लागण झाली होती. त्या तरूणीला कोरोनाची लागण झाल्याचे संकेत वेळीच दिसले नव्हते. ज्यामुळे ती इतर लोकांमध्ये फिरत राहिली.
8 / 10
दरम्यान या तरूणीमुळे 5 हजार लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समजतं. इतकेच नाही तर या तरूणीच्या संपर्कात येऊन संक्रमित झालेल्या अनेकांच मृत्यूही झाला आहे.
9 / 10
या तरूणीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेव्हा तिच्या बेडचा क्रमांक 31 होता. याच महिलेमुळे अनेकांना कोरोनाची लागण झाली आणि तिच्यामुळे अनेकांचा जीव गेला.
10 / 10
सियोल मेट्रोपॉलियन सरकार ने या तरूणी विरोधात हत्येची तक्रार दाखल केली आहे. अशा घटनांमुळे लोकांना त्यांच्या घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSouth Koreaदक्षिण कोरिया