शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: पालकांनो सावधान! कोरोना नवीन स्ट्रेन लहान मुलांनाही संक्रमित करणार; संशोधकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 14:48 IST

1 / 10
जगभरात आतापर्यंत 12 कोटी 88 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. अमेरिका सर्वाधिक या गंभीर महामारीने त्रस्त आहे. अमेरिकेत कोरोनाने आक्राळ-विक्राळ रुप धारण केले आहे. येथे तीन कोटींहून अधिक लोकांना कोरोना झाला आहे. तर 5.50 लाखहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे दररोज 20 लाख लोकांना कोरोनाची लस टोचली जात आहे. सध्या कोणत्याही देशात लहान मुलांना कोरोना लस दिली जात नाहीय. मात्र, संशोधकांनी मोठा इशारा दिला आहे. (New Corona Virus strains can also infect children's.)
2 / 10
कोरोनासोबतची लढाई जिंकायची असेल तर लहान मुलांना देखील लस देणे गरजेचे आहे. कारण अमेरिकेच्या तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार लहान मुलांना संक्रमित करू शकणाऱ्या नव्या कोरोना व्हायरसचे रुप लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
3 / 10
अमेरिकेच्या ब्रिघम अँड वुमन्स हॉस्पिटलच्या इमरजन्सी मेडिसीन विभागाचे डॉक्टर जेरेमी सॅमुअल फॉस्ट आणि जॉर्जटाउन यूनिवर्सिटी मेडिकल सेंटरमधील सेंटर फॉर ग्लोबल हेल्थ सायन्सचे डॉ. एंजेला रासमुसेन यांनी गंभीर इशारा दिला आहे.
4 / 10
सध्याच्या कोरोना लाटेमध्ये लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रकार खूप कमी आहेत. मात्र, त्यांच्यावर होणाऱ्या परिणामांबाबत सध्या काहीच सांगता येत नाहीय. कारण लहान मुलांमध्ये कोरोनाचे अधिकतर लक्षणे दिसत नाहीत.
5 / 10
या दोघांनुसार कोरोना व्हायरस म्युटेट होत राहणार आहे. यामध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक म्युटेशन होणार आहेत. यापैकी काही म्युटेशन हे लहान मुलांसाठीही घातक ठरण्याची शक्यता आहे.
6 / 10
यामुळे लहान मुलांना संक्रमण होऊन ते गंभीर आजारी पडण्याची भीती व्यक्त केली आहे. यामुळे अशी परिस्थिती निर्माण न होण्यासाठी लहान मुलांसाठीही लवकरात लवकर लसीकरण सुरु करावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
7 / 10
अमेरिकेचे प्रसिद्ध संक्रमक रोगाचे तज्ज्ञ डॉ. अँथोनी फौसी यांच्या म्हणण्यानुसार हर्ड इम्युनिटीसाठी लहान मुलांमध्ये लसीकरण खूप गरजेचे आहे. अद्याप लहान मुलांसाठी लस आलेली नाही. मात्र, अशा लसींचे क्लिनिकल ट्रायल सुरु झाले आहेत.
8 / 10
फौसी यांच्या नुसार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना येत्या सप्टेंबरपासून कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे. तर लहान मुलांना पुढील वर्षी कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे.
9 / 10
ऑल इंडिया रेडिओसोबत बोलताना पीएचएफआयचे अध्यक्ष डॉ. के श्रीनाथ रेड्डी यांनी सांगितले की, सुरुवातीला 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर कोरोना लसीची ट्रायल घेण्यात आलेली नाही. मात्र, काही देशांमध्ये 12 ते 18 वर्षांच्या मुलांमध्ये ट्रायल सुरु आहे.
10 / 10
या लसीचे जसे परिणाम समोर येतील ते लोकांना सांगितले जातील आपल्याही देशात ही लस मिळण्याची व्यवस्था केली जाईल.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस