शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus मक्का, जामा मशीद रिकामी; कोरोनाच्या संकटामुळे रमजान सुनासुना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 3:18 PM

1 / 10
मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान यंदा सुनासुना जाणार आहे. जगभरात कोरोनाचे संकट असल्याने त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या मक्केमध्येही चिटपाखरू दिसत नाहीय.
2 / 10
आज मक्केमध्ये तेथील काही मौलाना आणि सेवक अशा हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच लोकांनी नमाज अदा केला.
3 / 10
मुस्लिमांचे पवित्र स्थळ काबामध्ये रमजानच्या पहिल्या दिवशी नमाज अदा करण्यात आला. मात्र, इतर दिवशी असलेली गर्दीही तिथे नव्हती. कोरोनामुळे धार्मिक यात्रेवर बंदी आणण्यात आली आहे.
4 / 10
काबामध्ये जे लोक दिसत आहेत ते येथे काम करणारे कर्मचारी आहेत.
5 / 10
युएईमध्येच नाही तर भारतातही जामा मशीद सुनीसुनी वाटत आहे. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी मुस्लिम बांधवांनी एकत्र येणे टाळले आहे. मौलवींनीही त्यांना घरातूनच नमाज पठण करण्यास सांगितले आहे.
6 / 10
कोरोना व्हायरसमुळे जम्मू काश्मीरमध्येही मशीदी बंद होत्या.
7 / 10
भारतात लॉ़कडाऊन आहे. यामुळे आधीच जाहीर केले होते की धार्मिक स्थळे बंदच ठेवली जाणार. यामुळे पहिल्या दिवशी दिल्लीच्या जामा मशीदीमध्ये कोणीही आले नव्हते.
8 / 10
हा फोटोदेखील तुर्कस्थानचाच आहे. गेल्या वर्षी येथे पंगती उठत होत्या. आज तिथे कोणीही नाहीय.
9 / 10
तुर्कस्थानची निळी मशीदचा हा फोटो पाहा. २४ एप्रिल २०२० ला ही एकदम रिकामी जागा होती. जून २०१६ मध्ये रमजानमध्ये सैन्याच्या जवानांनी तोफ डागून रोजा सुरु झाल्याची माहिती दिली होती.
10 / 10
जामा मशीदीचा एरिअल व्ह्यू.
टॅग्स :RamzanरमजानUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीHaj yatraहज यात्राcorona virusकोरोना वायरस बातम्या