खूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस?; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 14:18 IST
1 / 13रशियातून एक आनंदाची बातमी आली आहे. आता रशियाच्या आरोग्यमंत्र्यांनीच विश्वासार्ह लसीचे परीक्षण पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. ही तीच लस आहे, जी गामालेया इंस्टिट्यूटने तयार केली आहे. या शिवाय इतरही दोन कंपन्यांनी क्लिनिकल ट्रायलसाठी परवानगी मागितली आहे. दि गामालेया इंस्टिट्यूटच्या लसीसंदर्भात, ती 10 ऑगस्ट अथवा त्यापूर्वीच बाजारात उपलब्ध होईल, असा दावा करण्यात आला होता.2 / 13स्पुतनिक न्यूज डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे आरोग्य मंत्री मिखाइल मुराश्को यांनी म्हटले आहे, की गामालेयाची लसचे परीक्षण पूर्ण झाले आहे. आता ही लस बाजारात केव्हा आनायची हे, संबंधित वैज्ञानिकांवर अवलंबून आहे.3 / 13स्पुतनिक न्यूज डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे आरोग्य मंत्री मिखाइल मुराश्को यांनी म्हटले आहे, की गामालेयाची लसचे परीक्षण पूर्ण झाले आहे. आता ही लस बाजारात केव्हा आनायची हे, संबंधित वैज्ञानिकांवर अवलंबून आहे.4 / 13मॉस्को येथील गामालेया इंस्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी गेल्या महिन्यातच दावा केला होता, की ते ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोनाच्या पहिल्या लसीला मंजुरी देऊ शकतात. याचाच अर्थ पुढील दोन महिन्यांत कोरोना व्हायरसची लस रशिया बाजारात आणेल. 5 / 13रशियन अधिकारी आणि वैज्ञानिकांनी सीएनएन चॅनलशी बोलताना सांगितले होते, की 10 ऑगस्ट अथवा त्या पूर्वीच लसीला मंजुरी देण्यासंदर्भात ते प्रयत्न करत आहेत. 6 / 13गामालेया इंस्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी दावा केला आहे, की ते सर्व सामान्य नागरिकांसाठी या लसीला 10 ऑगस्टपर्यंत मंजुरी देतील. मात्र, ही लस सर्वप्रथम फ्रंटलाइन हेल्थवर्कर्सना देण्यात येईल.7 / 13रशियाचे सोवरन वेल्थ फंडचे प्रमुख किरिल मित्रिव म्हणाले, ज्या प्रकारे आम्ही अवकाशात स्पुतनिक हे पहिले सॅटेलाईट सोडले होते, हा तसाच ऐतिहासिक क्षण आहे. स्पुतनिकसंदर्भात ऐकल्यानंतर अमेरिकन लोक हैराण झाले होते. तसेच ते ही लस लॉन्च झाल्यानंतरही पुन्हा एकदा हैराण होणार आहेत.8 / 13मात्र अद्याप, या लसीच्या परीक्षणाचा डेटा रशियाने जाहीर केलेला नाही. त्यामुळे ही लस किती प्रभावी असेल हे सांगितले जाऊ शकत नाही. 9 / 13याशिवाय, लस लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी राजकीय दबाव टाकला जात असल्याची टीकाही काही जण करत आहेत. तसेच लसीच्या अर्धवट मानवी चाचणीवरही प्रश्न उपस्थित होत आहे.10 / 13जगभरात डझनावर लसींचे परीक्षण सुरू आहे. अनेक देशांत लसींचे परीक्षण तिसऱ्या टप्प्यात आहे. रशियन लसीच्या डेव्हलपर्सनी आपल्या लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा 3 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे ठरवले होते.11 / 13यानंतर तिसऱ्या टप्प्याच्या पहीक्षणाला सुरुवात होईल. रशियन वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की ही लस फार लवकर तयार करण्यात आली. कारण ही आधीपासूनच अशा प्रकारच्या इतर आजारांशी लढण्यात सक्षम आहे. हेच म्हणणे इतरही काही देशांतील वैज्ञानिकांचे आहे. 12 / 13रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले, की रशियन सैनिकांनी ह्यूमन ट्रायलसाठी व्हॉलंटिअर्स म्हणून काम पारपाडले आहे. दावा केला जात आहे, की या प्रोजेक्टचे प्रमुख अलेक्झँडर गिन्सबर्ग यांनी स्वतःच ही लस घेतली आहे. 13 / 13रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले, की रशियन सैनिकांनी ह्यूमन ट्रायलसाठी व्हॉलंटिअर्स म्हणून काम पारपाडले आहे. दावा केला जात आहे, की या प्रोजेक्टचे प्रमुख अलेक्झँडर गिन्सबर्ग यांनी स्वतःच ही लस घेतली आहे.