1 / 8कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनावर औषध अथवा लस तयार करण्याचे काम सुरू आहे. कोरोनासंदर्भातील अँटीबॉडीजवरही काम सुरू आहे. अशातच आता एका आश्चर्यचकित करणारी गोष्ट घडली आहे. एका बाळाने थेट कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसहच जन्म घेतला आहे. यामुळे डॉक्टरही हैराण झाले आहेत. (प्रतीकात्मक फोटो)2 / 8ही आश्चर्यचकित करणारी घटना चीनच्या शेनझेनमध्ये घडली आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे, की आईकडून नैसर्गिकरित्या बाळाला अँटीबॉडीज मिळाल्या आहेत. शेनझेन थर्ड हॉस्पिटलने म्हटले आहे, की या संपूर्ण केससंदर्भात ते संबंधित महिला आणि मुलाचा अधिक अभ्यास करत आहेत. (प्रतीकात्मक फोटो)3 / 8बाळाच्या आईला एप्रिल महिन्यात कोरोनाचे निदान झाले होते. मात्र, त्यांच्या शरिरात कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसून आली नव्हती. डिलिव्हरीनंतर जेव्हा तपासणी केली, तेव्हा बाळ आणि त्याची आई, दोघेही कोरोना निगेटिव्ह होते.4 / 8संबंधित महिलेने 30 मरोजी शेनझेन थर्ड हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म दिला. ही महिला मुळची हुबेई येथील आहे.5 / 8हुबेईतील वुहान हे कोरोना महामारिची केंद्र आहे. तेथून ही महामारी जगभर पसरली. डॉक्टर म्हणाले, आता या बाळात नैसर्गिकरित्याच कोरोना व्हायरसशी लढण्याची क्षमता आहे.6 / 8चीनी माध्यमांमध्ये या महिलेचे बदललेले नाव झिआओ सांगण्यात आले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाचे निदान झाल्यानंतर 10 दिवस झिआओ यांच्यावर उपचार सुरू होते.7 / 8झिआओ या शेनझेनमध्येच राहतात आणि काम करतात. मात्र, त्या जानेवारी महिन्यात पतीसह हुबेईतील वुचांग शहरात गेल्या होत्या. 8 / 8झिआओ या शेनझेनमध्येच राहतात आणि काम करतात. मात्र, त्या जानेवारी महिन्यात पतीसह हुबेईतील वुचांग शहरात गेल्या होत्या.