म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Coronavirus: अमेरिकेसाठी कठीण आठवडा, कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा १०,००० पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 14:09 IST
1 / 11कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता देशासह अनेक जगभरातील देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. बहुतांश देशांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. 2 / 11अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ११५० लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १०००० लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 3 / 11जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत ३,६६००० लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये गेल्या २४ तासांत ३०००० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत अमेरिकेत १०७८३ लोकांचा मृत्यू झाला आहे4 / 11अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर कोरोनाचे केंद्रबिंदू बनले आहे, या शहरात आत्तापर्यंत ४७५८ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.5 / 11जगभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत ७४००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जवळपास ५०००० लोकांचा मृत्यू युरोपीयन देशांमध्ये झाला आहे.6 / 11अमेरिकेकडून सांगण्यात येत आहे की, १ लाखांपेक्षा कमी मृत्यु कोरोनामुळे होतील. १ लाखांच्या आता कोरोनाचे मृत्यू रोखण्यात अमेरिका यशस्वी ठरेल. 7 / 11अमेरिकेसाठी सध्याचा आठवडा अतिशय महत्वाचा असून हा कठिण काळ आहे. या आठवड्यानंतर पुन्हा चांगली पहाट उजाडेल, अशी आशा अमेरिकेला आहे. 8 / 11भारतात सुद्धा कोरोनोमुळे चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ३५४ नवीन रुग्ण आढळले आहेत.9 / 11गेल्या २४ तासांत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत ४४२१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.10 / 11गेल्या २४ तासांत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत ४४२१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.11 / 11अमेरिकेतील एका जोडप्याचा हा फोटो खूप काही सांगून जातोय. कोरोनाची भीती अन् कहर या दोघांच्या चेहऱ्यावरील भाव सर्वकाही सांगतोय