शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : Covid - 19 संबंधी नवं चॅलेंज, ...तर विजेत्यांना मिळणार तब्बल ३७ कोटी रूपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 10:07 IST

1 / 9
जर तुमच्याकडे वैज्ञानिक विचार करणारा मेंदू असेल आणि जर तुम्ही वेगाने काम करणारी स्वस्त कोविड-१९ टेस्टची पद्धत शोधू शकले तर तुम्हाला तब्बल ५ मिलियन डॉलर जिंकण्याची संधी आहे. ५ मिलियन डॉलर म्हणजे ३७.३९ कोटी रूपये. बक्षीसाची ही रक्कम एक्सप्राइज नावाची संस्था देणार आहे. ही स्पर्धा ६ महिने चालेल. विजयी व्यक्तीचं नाव पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात घोषित केलं जाईल.
2 / 9
खाजगी संस्था एक्सप्राइज (XPrize) ने दोन दिवसांआधी २८ जुलैला एका चॅलेंजची घोषणा केली होती. हे चॅलेंज अशा लोकांसाठी आहे जे कोविड-१९ टेस्टची स्वस्त आणि वेगाने परिणाम दाखवणारी पद्धत शोधतील.
3 / 9
६ महिने चालणाऱ्या या सपर्धेला 'XPrize रॅपिड कोविड टेस्टिंग नाव देण्यात आलं आहे. याचा उद्देश हा आहे की, लवकरात लवकर चांगली आणि स्वस्त कोविड-१९ टेस्टिंग किट तयार करणे. जी वेगाने चांगला रिझल्ट देऊ शकेल. याने संपूर्ण मानवतेचा फायदा होईल.
4 / 9
XPrize ने सांगितले की, आम्हाला इतकी सरळ आणि सहज टेस्टिंग किट बनवायची आहे की, कोणताही लहान मुलगाही त्याचा उपयोग करू शकेल. टेस्टचा रिझल्ट येण्याला कमीत कमी १५ मिनिट लागावे.
5 / 9
सध्या परदेशात एका कोविड-१९ टेस्टवर साधारण १०० डॉलर म्हणजे ७४७९ रूपये खर्च येत आहे. हा कमी होऊन १५ डॉलर झाला पाहिलजे म्हणजे ११२१ रूपये इतका.
6 / 9
XPrize ने सांगितले की, एकूण पाच विजयी टीमची निवड केली जाईल. प्रत्येक टीमला १ मिलियन डॉलर म्हणजे ७.४७ कोटी रूपये दिले जातील. यात पीसीआर टेस्टची पद्धत असावी किंवा एंटीजेन टेस्टची पद्धत असावी.
7 / 9
विजेत्या प्रत्येक टीमला दोन महिन्यांपर्यंत सतत दर आठवड्याला कमीत कमी ५०० कोविड-१९ टेस्ट करावे लागतील. पण ते याला वाढवून १००० टेस्ट प्रति आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त करू शकतात.
8 / 9
XPrize चे सीईओ अनुशेह अन्सारी म्हणाले की, टेस्टिंगच्या कमतरतेमळे अनेक कोविड केसची माहितीच मिळत नाही. जर लोकांना योग्य वेळी टेस्टचा रिपोर्टला मिळाला तर उपचार करणे सोपे होईल.
9 / 9
अनशेह अन्सारी म्हणाले की, याच कारणाने आम्ही ही स्पर्धा चार कॅटेगरीत आयोजित केली आहे. या कॅटेगरी अंतर्गत लोक भाग घेऊ शकतात. या कॅटेगरी एट होम, प्वाइंट ऑफ केअर, डिस्ट्रीब्यूशन लॅब आणि हाय थ्रोपुट लॅब आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यResearchसंशोधन