कोरोना मृतांचा आकडा 'या' देशाच्या सरकारने लपविला? आरोग्यमंत्र्यांनी दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 16:01 IST
1 / 7कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दक्षिण अमेरिकन देश चिलीच्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. आतापर्यंत चिलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1.67 लाख इतकी झाली आहे. तर 3101 लोकांचा मृत्यू झाला आहे.2 / 7कोरोना मृतांचा आकडा कमी दाखविण्यात आल्याचा आरोप चिली सरकारवर होता. निषेधानंतर सरकारने डेटा रेकॉर्ड करण्याचे नियम बदलले, परंतु लोकांमध्ये याबाबत नाराजी होती. दरम्यान, मृतांची संख्या वाढल्यामुळे चिली सरकारवर दबाव वाढत होता. यानंतर शनिवारी आरोग्यमंत्री जेमी मॅनालिच यांनी राजीनामा दिला. (फोटो - चिलीचे आरोग्यमंत्री जेमी मॅनालिच)3 / 7चिलीचे राष्ट्रपती सेबॅस्टियन पिनेरा म्हणाले की, 'जेमी मॅनालिच यांनी चिलीतील लोकांना वाचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न सोडले नाहीत.' आता शिक्षणतज्ज्ञ असलेल्या डॉ. एनरिक पॅरिस यांना आरोग्यमंत्री केले गेले आहे. (फोटो - चिलीचे राष्ट्रपती सेबॅस्टियन पिनेरा)4 / 7चिलीची लोकसंख्या केवळ एक कोटी 90 लाख आहे. त्यामुळे कोरोनाची 1.67 लाख प्रकरणे धोकादायक मानली जातात. १० लाख लोकसंख्येच्या कोरोनाच्या केसची सरासरी जर आपण पाहिली तर हा देश लॅटिन अमेरिकेत सर्वात वर पोहोचला आहे. 5 / 7सरकारने व्यापक आकडेवारी जाहीर करावी, असे चिलीमधील रेंकाचे मेयर क्लॉडियो कास्ट्रो म्हणाले होते. यापूर्वी त्यांच्या पालिकेत स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 22 लोकांचा मृत्यू झाला आणि 11 कुटुंबे कोरोनाच टेस्टच्या प्रतीक्षेत आहेत. पण केंद्रीय आरोग्य मंत्रालय फक्त 9 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगत होते.6 / 7चिली सरकार कोरोनाशी संबंधित सर्वसमावेशक डेटा जाहीर करीत नसल्याने विरोधी पक्ष, महापौर, वैद्यकीय तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते जेमी मॅनालिच यांना विरोध करत होते. 7 / 7दुसरीकडे, लॉकडाऊन आणि साथीच्या रोगामुळे चिलीतील लोकांना जेवणची समस्या येऊ लागली. यानंतर सरकारच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले. लोकांचा रोष शांत करण्यासाठी आरोग्यमंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे समजते.