1 / 10जर तुम्ही गर्दीपासून दूर मास्क न घालता फिरत असाल किंवा कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आला नसाल तर तुम्हाला कोरोनाचा धोका नाही असं समजू नका, सांभाळून राहा, जगातील अनेक वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात कोविड १९ हवेतून पसरत असल्याचा दावा केला आहे.2 / 10३२ देशातील २३९ वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात असं आढळलं आहे की, नोवेल कोरोना व्हायरस हवेतील छोट्या छोट्या कणामध्ये जिवंत राहतात आणि त्यातून ते लोकांना संक्रमित करु शकतात. 3 / 10यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा प्रार्दुभाव हवेतून होत नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की, हा धोकादायक विषाणू फक्त थुंकीच्या माध्यमातून पसरु शकतो. हे सुक्ष्म कण खोकला, शिंकणे अथवा बोलताना शरीरातून बाहेर येतात. थुंकीमधील कण इतके हलके नाही की ते हवेसोबत उडतील. ते जमिनीवर पडतात असं म्हणाले होते. 4 / 10पण न्यूयॉर्क टाईम्सच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार शास्त्रज्ञांचा नवा दावा आता काही वेगळंच सांगत आहे. वैज्ञानिकांनी डब्ल्यूएचओला या विषाणूच्या सूचनेमध्ये त्वरित सुधारणा करण्याची विनंती केली आहे. या विषाणूचा प्रसार जगभरात सातत्याने वाढत आहे.5 / 10आतापर्यंत, जगभरात १ कोटी १५ लाख ४४ हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५ लाख ३६ हजारांहून अधिक लोक यामुळे मरण पावले आहेत. भारतातही कोविड -१९ संसर्ग झालेल्यांचा आकडा ७ लाखांच्या जवळपास पोहोचला आहे, 6 / 10भारतात आतापर्यंत १९२८६ लोक मृत्युमुखी पडले आहेत. अशा परिस्थितीत जर हा विषाणू जर हवेतून पसरण्याचा दावा खरा ठरला तर लोकांच्या चिंतेत आणखी वाढ होईल.7 / 10३२ देशांतील या २३९ शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला एक जाहीर पत्र लिहिले आहे. या सर्व वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की व्हायरसचे सुक्ष्म कण हवेमध्ये तरंगतात, ज्यामुळे लोकांना संसर्ग होऊ शकतो यावर याचे पुरेसे पुरावे आहेत. पुढील आठवड्यात हे पत्र वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध केले जाईल8 / 10न्यूज एजन्सी रॉयटर्सने डब्ल्यूएचओला या नवीन दाव्यावर प्रतिक्रिया देण्यास सांगितले होते. परंतु अद्याप त्यांनी यावर काहीही भाष्य केले नाही. न्यूयॉर्क टाईम्सच्या या वृत्तानुसार, 'शिंका आल्यानंतर तोंडातून थुंकीचे मोठे कण बाहेर आले किंवा अनेक सुक्ष्म कण खोलीत पसरु शकतात. जेव्हा इतर लोक श्वास घेतात, तेव्हा हवेतील विषाणू त्यांच्या शरीरात प्रवेश करुन त्यांना संक्रमित करु शकतात.9 / 10तथापि वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार हेल्थ एजन्सीने म्हटले आहे की, हा विषाणू हवेत जिवंत राहू शकतो याचे पुरावे दिले आहेत, पण हा हेवतून पसरणारा विषाणू आहे अशा निष्कर्षापर्यंत जाऊ शकत नाही. 10 / 10न्यूयॉर्क टाइम्सने डब्ल्यूएचओमधील संसर्ग रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या तांत्रिक पथकाचे प्रमुख डॉ. बेनेडेटा अलेग्रेन्झी यांचा हवाला देत म्हटले आहे की “हा विषाणू एयरबोर्न व्हायरस असू शकेल असं आम्ही बऱ्याचदा म्हटलं आहे. पण असा दावा करण्यासाठी अद्यापतरी कोणतेही ठोस आणि स्पष्ट पुरावे नाहीत.