शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धक्कादायक! कोरोना लशीच्या कुपीत पाणी टाकून विक्री; तरुणानं कमावले २० कोटी!

By मोरेश्वर येरम | Published: February 17, 2021 8:57 PM

1 / 10
कोरोना लसीच्या कुप्यांमध्ये चक्क मिनिरल वॉटर किंवा Saline solution भरुन कोट्यावधींची कमाई करणाऱ्या एका चीनी तरुणाला अटक करण्यात आली आहे.
2 / 10
खोटी लस विकून जनतेच्या डोळ्यांत धूळफेक केल्याचा आरोप चीनच्या अधिकाऱ्यांनी कोंग नावाच्या एका तरुणाला अटक केली आहे.
3 / 10
कोरोना लशीशी निगडीत गैरव्यवहार करणाऱ्यांविरोधात चीनच्या सरकारने काही महिन्यांपासून जोरदार मोहीम सुरू केली आहे. कोंग आणि त्याच्या टोळीनं कोरोना लशीच्या कुपीमध्ये पाणी भरून त्यातून तब्बल २० कोटी १७ लाख रुपयांची कमाई केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
4 / 10
डेली मेल या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना लशीच्या माध्यमातून लोकांची फसवणूक आणि उत्पादन करणाऱ्या एकूण ७० आरोपींना अटक करण्यात आली आहे. चीनी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात आतापर्यंत २१ गुन्ह्यांची नोंद केली आहे.
5 / 10
धक्कादायक बाब अशी की कोंग याच्या टोळीने गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून खोटी लस तयार करण्याचं काम सुरू केलं होतं. त्यांनी लशीच्या कुप्यांमध्ये मिनिरल वॉटर किंवा Saline solution भरुन तब्बल ५८ हजार लशीचे डोस तयार केले होते.
6 / 10
चीनमध्ये ज्यापद्धतीनं कोरोनावरील खऱ्या लशीचं पॅकिंग केलं जातंय. त्याच पद्धतीनं कोंग याच्या टोळीनं खऱ्या लशीची नक्कल करुन खोटी लस तयार करण्याचं काम केलं.
7 / 10
धक्कादायक बाब अशी की हाँगकाँगला पाठविण्यात आलेल्या कोरोनाच्या लशींमध्ये ६०० खोट्या लशी देखील पाठविण्यात आल्याचं लक्षात आलं आहे.
8 / 10
चीनच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात अधिकृत माहिती आज जाहीर केली आहे. खोट्या लशीच्या पुरवठ्याबाबत संबंधित आरोपींना २५ डिसेंबर २०२० रोजीच अटक करण्यात आल्याची माहिती चीननं जाहीर केली आहे.
9 / 10
चीनमधील उच्चभ्रू रुग्णालयांमध्ये तर खोट्या लशींची मोठ्या किंमतीला विक्री करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.
10 / 10
चीनमधील या गौप्यस्फोटानंतर संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली आहे. यासोबतच आता चीनी लशीच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन