शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Worlds Richest Country : अमेरिकेला मागे टाकत चीन बनला जगातला सर्वात श्रीमंत देश; दोन दशकांत एवढी वाढली ड्रॅगनची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 2:37 PM

1 / 8
आतापर्यंत अमेरिका संपत्तीच्या बाबतीत सर्वात पुढे होता. पण आता चीनने अमेरिकेचा हा दर्जा हिसकावला आहे. होय, आता चीन संपत्तीच्या बाबतीत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे. चीनने दोन दशकांत आपली संपत्ती प्रचंड वाढवली आणि अमेरिकेला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.
2 / 8
दोन दशकांत तिप्पट वाढली जगाची संपत्ती - गेल्या दोन दशकात जागतिक संपत्ती तिपटीने वाढली आहे आमि यात चीन आघाडीवर आहे. चीनने अमेरिकेला मागे टाकत जगभरात अव्वल स्थान पटकावले आहे. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, चीनकडे जगातील एकूण संपत्तीपैकी एक तृतीयांश संपत्ती आहे.
3 / 8
प्रचंड वाढली चीनची संपत्ती - WTO मध्ये सामील होण्याच्या एक वर्ष आधी 2000 साली चीनची संपत्ती केवळ 7 ट्रिलियन डॉलर होती. ती वाढून आता 120 ट्रिलियन डॉलरवर पोहोचली आहे.
4 / 8
अहवालानुसार चीनच्या आर्थिक विकासाला सातत्याने गती मिळाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत जगाने जेवढी संपत्ती मिळवली, त्यात एक तृतीयांश एवढी संपत्ती एकट्या चीनकडे आहे.
5 / 8
10 देशांवर आधारीत आहे अहवाल - जगातील 60 टक्के उत्पन्न असलेल्या 10 देशांच्या ताळेबंदावर नजर ठेवणाऱ्या मॅनेजमेंट कंसल्टंट मॅकिन्से अँड कंपनीच्या संशोधन शाखेच्या अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे. खरे तर, मॅनेजमेंट कंसल्टंट मॅकिन्से जागतिक उत्पन्नाच्या 60 टक्क्यांहून अधिकचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दहा देशांच्या राष्ट्रीय बॅलेन्स शीटची पाहणी करते.
6 / 8
मॅनेजमेंट कंसल्टंट मॅकिन्सेचे मुख्यालय झुरिच येथे आहे. याच्या अहवालात सांगण्यात आले आहे, की 2000 मध्ये जगभरातील एकूण संपत्ती 156 ट्रिलियन डॉलर होती, ती वाढून आता 2020 मध्ये 514 ट्रिलियन डॉलरवर पोहोचली आहे.
7 / 8
हे आहे अमेरिका खाली घसरण्याचे मुख्य कारण - अमेरिकेच्या संपत्तीतही प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या 20 वर्षांत अमेरिकेच्या संपत्तीत दुपटीने वाढ झाली आहे. सन 2000 मध्ये अमेरिकेची संपत्ती 90 ट्रिलियन डॉलर एवढी होती. या अहवालात म्हटले आहे की, येथील प्रॉपर्टीच्या किमतीत फारशी वाढ न झाल्याने अमेरिकेतील मालमत्ता चीनच्या तुलनेत कमी राहिली. यामुळेच अमेरिका पहिल्या क्रमांकावरून घसरली आणि हा मान आता चीनला मिळाला आहे.
8 / 8
अमेरिका-चीन Currency युद्ध...
टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडनXi Jinpingशी जिनपिंग