शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:39 IST

1 / 10
अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेले युद्ध संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्ट्रेट होर्मुझही जल वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी एक प्लॅन तयार करण्यात आला आहे. ज्यात दोन फेज कराराचा समावेश आहे.
2 / 10
अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच सोमवारपर्यंत इराण डीलसाठी तयार होऊ शकतो असा दावा केला होता. ते खरे ठरताना दिसत आहे. अमेरिका आणि इराणला असा प्लॅन मिळाला आहे. ज्यामध्ये मध्य पूर्वेतील लढाऊ कारवाया समाप्त करण्याच्या मंजुरीचा समावेश आहे.
3 / 10
अमेरिकन आणि इराणी अधिकाऱ्यांकडून तात्काळ प्रतिसाद मिळाला नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी भाष्य करण्यास नकार दिला. वेंस विटकॉफ आणि अराघची यांच्या संपर्कात असीम मुनीर होते असं या रिपोर्टमध्ये दिले आहे. या ड्राफ्टचे दोन टप्पे आहेत, ज्यात तात्काळ युद्धविराम आणि त्यानंतर एका व्यापक कराराचा समावेश आहे.
4 / 10
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर या युद्धात मध्यस्थी करत चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स, विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी 'रात्रभर' सतत संपर्कात होते असं रॉयटर्स वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे
5 / 10
अमेरिका-इराण प्रस्तावावर करतंय विचार - पाकिस्तानने प्रस्तावित केलेल्या या कराराचा अमेरिका आणि इराण दोघेही आढावा घेत आहेत. परंतु जर तात्पुरता युद्धविराम झाला तर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडली जाणार नाही हे इराणने स्पष्ट केले आहे. याचा अर्थ आशिया आणि युरोपातील देशांमधील तेल आणि एलपीजीचे संकट कायम राहील.
6 / 10
तात्पुरत्या युद्ध विरामाखाली इराण होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणार नाही असं इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी इराण कोणताही दबाव किंवा अंतिम मुदत स्वीकारणार नाही हे स्पष्ट आहे.
7 / 10
पाकिस्तानची मध्यस्थी - मध्य पूर्वेतील युद्ध संपवण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थी करत असल्याच्या बातम्या याआधी समोर आल्या होत्या. त्यात आता अमेरिका आणि इराण युद्ध संपवण्यासाठी पाकिस्ताननं एक प्रस्ताव तयार केला आहे आणि रातोरात हा प्रस्ताव इराण आणि अमेरिकेशी शेअर केला. ज्यामध्ये युद्धविरामानंतर लगेचच एका सर्वसमावेशक करारासह द्विस्तरीय दृष्टिकोन मांडण्यात आला आहे.
8 / 10
पाकच्या या प्रस्तावावर इराण-अमेरिका विचार करत आहे. आज सर्व बाबींवर सहमती दर्शवली जाणार असून पाकिस्तानमार्फत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राथमिक सामंजस्य कराराला अंतिम स्वरूप दिले जाईल. ज्याचा आता सामंजस्य करारात (MOU) मसुदा तयार केला जाईल. या वाटाघाटी प्रक्रियेत पाकिस्तान एकमेव 'कम्युनिकेशन चॅनल' म्हणून भूमिका बजावत आहे असं सूत्रांनी सांगितले.
9 / 10
या कराराला तात्पुरते 'इस्लामाबाद करार' असं नाव देण्यात आले आहे. यामध्ये होर्मुझ सामुद्रधुनीसाठी एका प्रादेशिक आराखड्याचा समावेश असेल आणि अंतिम समोरासमोरच्या वाटाघाटी इस्लामाबादमध्ये होतील असं पाकच्या प्रस्तावात आहे.
10 / 10
दोन फेजमधील या प्रस्तावात पहिल्या टप्प्यात ४५ दिवसांत संभाव्य युद्धविराम होईल. या काळात युद्ध कायमचे संपवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल. दुसऱ्या टप्प्यात युद्ध संपवण्यासाठी एक करार केला जाईल. जर चर्चेसाठी वेळ हवा असेल तर युद्धविराम वाढवला जाऊ शकतो. पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की या मध्यस्थी देशांच्या माध्यमातून युद्ध रोखण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान