1 / 10कोरोना व्हायरसवरून चीन आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) विरोधात अमेरिकेनंतर आता इतर देशांचाही रोष वाढत आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलने जागतिक आरोग्य संघटनेसोबतचे संबंध तोडण्याची धमकी दिली आहे. ब्राझीलने जागतिक आरोग्य संघटनेने पक्षपात आणि राजकारण केल्याचा आरोप केला आहे.2 / 10ब्राझीलने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांनी जागतिक आरोग्य संघटना निष्पक्ष नसल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेने पैसे देणे थांबवताच संघटनेने आपले सर्व आश्वासने फिरवल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.3 / 10या आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मे महिन्याच्या अखेरीस म्हणाले होते की, अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेशी संबंध तोडेल. तसेच, कोरोना व्हायरसच्या बाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने चीनवर जास्त विश्वास ठेवला, असाही आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. 4 / 10अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला सर्वाधिक जास्त पैसे देत होते. यातच ब्राझीलने 2019 मध्येच पैसे देणे बंद केले. एका वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार, जागतिक आरोग्य संघटनेची ब्राझीलकडे ३३ मिलियन डॉलरची थकबाकी आहे.5 / 10कोरोना व्हायरसमुळे ब्राझील हा जगातील सर्वात त्रस्त देशांपैकी एक आहे. ब्राझीलमध्ये 6 लाख 46 हजाराहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 35 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.6 / 10कोरोना व्हायरसची उत्पत्ती कोठून झाली, याची सध्या चौकशी सुरू आहे. मात्र, अमेरिकेतील मिसौरी राज्याने चीनविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 7 / 10मिसौरी हे चीनविरोधात गुन्हा दाखल करणारे पहिले राज्य ठरले आहे. चीनने कोरोना कोरोना व्हायसरबाबत माहिती लपविली. तसेच. ज्या लोकांनी हे समोर आणले, त्यांना अटक केली, असा आरोप चीनवर केला जात आहे.8 / 10कोरोना व्हायरसची उत्पती कोठून झाली. याविषयी निष्पक्ष तपासणीचा मसुदा प्रस्ताव 73 व्या जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सादर करण्यात आला. या प्रस्तावात भारतासह 100 हून अधिक देशांचा समावेश आहे.9 / 10ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, सौदी अरेबिया, आफ्रिकन गट आणि युरोपियन युनियन या देशांनाही कोरोना व्हायरस कोठे व कसा पसरला? हे जाणून घ्यायचे आहे.10 / 10या प्रस्तावावर कोणत्याही देशावर आरोप केलेला नाही, मात्र, जिनपिंग यांनी चीनचा बचाव करीत असे म्हटले की आम्ही जागतिक आरोग्य संघटना आणि इतर देशांना वेळेत सर्व काही सांगितले होते.