शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadanvis: निळं जॅकेट, हाती सुटकेस; अध्यक्ष महोदयांसोबत फडणवीस रशियात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 18:43 IST

1 / 9
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रशियात दाखल झाले आहेत. पुढील 2 दिवस ते रशियाच्या दौऱ्यावर असणार आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचं 14 सप्टेंबरला मॉस्को (Moscow) या ठिकाणी अनावरण होणार आहे. त्यासाठी, महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते रशियात पोहोचले आहेत.
2 / 9
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण होत आहे. त्यांच्यासोबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील रशियात दाखल आहेत. फडणवीसांनी पोहोचलो, असे कॅप्शन देत ट्विटरवरुन रशियातील फोटोही शेअर केले आहेत. तसेच, आज येथील भारतीय नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत.
3 / 9
समाजसुधारक, कवी आणि लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनावर रशियन क्रांतीचा मोठा प्रभाव होता. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता आणि रशियातील लेनिनच्या नेतृत्वाखालील कामगार क्रांतीमुळे ते भारावून गेले.
4 / 9
अण्णाभाऊंच्या साहित्यांमध्ये स्टॅलिनग्राडचा पोवाडा, रशियाचा माझा प्रवास आणि अनेक कथा आणि कादंबऱ्या रशियन भाषेत अनुवादित झाल्या आहेत. त्यामुळे, रशियातही अण्णांच्या साहित्याची आणि व्यक्तीमत्वाची मोठी छाप आहे.
5 / 9
“मॉस्को येथे मी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमवेत अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे अनावरण करणे हा माझा सन्मान आहे,” असे फडणवीस यांनी बुधवारी सांगितले.
6 / 9
मुंबई विद्यापीठाच्या युरेशियन स्टडीज विभागांतर्गत भारत-रशिया राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त रशियामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
7 / 9
ही परिषद 14 आणि 15 सप्टेंबर रोजी मॉस्को येथील रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज लायब्ररी येथे होणार आहे. भारतातील भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेसह (ICCR) मुंबई विद्यापीठाने या प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
8 / 9
इंडियन कौन्सिल फॉर हिस्टोरिकल रिसर्च (ICHR) चे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे म्हणाले, 'आज मॉस्कोमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल प्रेम आणि आदर असलेल्या लोकांचा एक वर्ग आहे आणि रशियामध्ये त्यांच्या प्रतिमेचे उद्घाटन होत आहे, ही एक सन्मानाची गोष्ट आहे.'
9 / 9
दरम्यान, रशियात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचं अनावरण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्याच निमित्ताने फडणवीस रशिया दौऱ्यावर गेले आहेत. पण दुसरीकडे आज सह्याद्री अतिथीगृहात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.
टॅग्स :russiaरशियाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Narvekarराहुल नार्वेकर