पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशु शुक्ला यांची सहकाऱ्यांसोबत अंतराळात पार्टी! पाहा PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 14:21 IST
1 / 8भारतासाठी अभिमानाची बाब ठरलेले ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला, जे १४ दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर होते, ते १४ जुलै रोजी पृथ्वीवर परत येण्यासाठी सज्ज झाले आहेत. घरवापसीपूर्वी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतराळात पार्टी केल्याची छायाचित्रे समोर आली आहेत.2 / 8शुभांशु शुक्ला यांनी अंतराळात केवळ वैज्ञानिक प्रयोगच केले नाहीत, तर चक्क शेतीही केली. त्यांनी पेट्री डिशमध्ये मूग आणि मेथी उगवून दाखवले, जे आता त्यांनी ISSच्या फ्रीजरमध्ये ठेवले आहेत.3 / 8नवीन फोटोंमध्ये शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सहकारी शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये तरंगत, जेवणाचा आनंद घेताना आणि हसताना दिसत आहेत. नासाने गुरुवारी संध्याकाळी घोषणा केली की, शुक्ला आणि इतर तीन क्रू सदस्यांचा पृथ्वीवर परतीचा प्रवास १४ जुलैपासून सुरू होईल.4 / 8नासा कमर्शियल क्रू प्रोग्रामचे व्यवस्थापक स्टीव्ह स्टिच यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, 'आम्ही स्टेशन प्रोग्रामवर काम करत आहोत आणि एक्सिओम-४ च्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. मला वाटते की आम्हाला ते मिशन अनडॉक करावे लागेल आणि अनडॉक करण्याचे सध्याचे लक्ष्य १४ जुलै आहे.'5 / 8ग्रुप कॅप्टन शुक्ला हे ISSवर जाणारे पहिले भारतीय ठरले आहेत, तसेच १९८४ मध्ये अंतराळात गेलेल्या विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर ते दुसरे भारतीय अंतराळवीर आहेत.6 / 8त्यांनी या १४ दिवसांच्या मोहिमेदरम्यान सात महत्त्वाचे प्रयोग केले. याच प्रयोगांचा एक भाग म्हणून, अंतराळात आपल्या शेवटच्या टप्प्यात शुक्ला यांनी शेतकऱ्याची भूमिका निभावली. त्यांनी पेट्री डिशमध्ये मूग आणि मेथीचे दाणे उगवले. त्यानंतर त्यांनी ते ISSच्या फ्रीजरमध्ये ठेवले आणि त्याची छायाचित्रेही शेअर केली.7 / 8या प्रयोगामागे मोठे वैज्ञानिक उद्दिष्ट आहे. सूक्ष्म गुरुत्वाकर्षण (microgravity) अंकुरण आणि वनस्पतींच्या प्रारंभिक विकासावर कसा परिणाम करते, हे जाणून घेणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या बियाणे अनेक पिढ्यांपर्यंत उगवली जातील आणि त्यांच्या आनुवंशिकी तसेच पोषण प्रोफाइलमध्ये होणारे बदल तपासले जातील.8 / 8ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची ही 'एक्सिओम ४' म्हणजेच 'मिशन आकाश गंगा' ही भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेचा मार्ग मोकळा करणारी ठरली आहे. त्यांच्या या यशाने भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला एक नवी दिशा मिळाली आहे.