भीषण आगीनं कॅलिफोर्नियाचा आसमंत भगवा; ४ लाखांहून अधिक एकरावर पसरली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 17:40 IST
1 / 10अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील जंगलाला भीषण आग लागली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही आग अतिशय वेगानं पसरली. 2 / 10जंगलात लागलेल्या आगीमुळे ओरेगॉनमधील शेकडो घरं भस्मसात झाली आहेत. आगीमुळे प्रथमच ओरेगॉन राज्याचं इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं गव्हर्नर केट ब्राऊन यांनी सांगितलं. 3 / 10आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र त्या प्रयत्नांना अद्याप यश आलेलं नाही.4 / 10कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेली आग अद्यापही धुमसते आहे. त्यामुळे संपूर्ण आसमंत भगव्या रंगानं व्यापला आहे.5 / 10अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ते अपुरे पडत आहेत. जंगलात ८० किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहत आहेत. त्यामुळे आग वेगानं पसरत आहे.6 / 10वाऱ्याच्या वेगामुळे आगीची भीषणता वाढतच चालली आहे. त्यामुळे ओरेगॉनच्या पश्चिमेकडील काही भागांतील घरं तत्काळ रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.7 / 10आग वेगानं पसरत असल्यानं पुढील काही दिवस आणखी आव्हानात्मक असतील, असा गंभीर इशारा गव्हर्नर केट ब्राऊन यांनी दिला आहे.8 / 10कालपर्यंत आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अनेकांची घरं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. 9 / 10कॅलिफॉर्नियाच्या जंगलात लागलेल्या आगामुळे आतापर्यंत ५ वसाहती पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.10 / 10आपत्कालीन यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार, ४ लाख ७० हजार एकर परिसरात आग पसरली आहे. त्यापुढे अग्निशमन दलाची यंत्रणादेखील कमी पडत आहे.