शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:53 IST

1 / 8
अमेरिकेसोबत अण्वस्त्र कार्यक्रमावर चर्चा सुरु असतानाच इस्रायलने इराणवर जबर हल्ला चढविला होता. याला आता ११ दिवस झाले आहेत. परंतू, दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेने सर्वात शक्तीशाली लढाऊ विमानांमधून सर्वात शक्तीशाली बंकर बस्टर ब़ॉम्ब इराणच्या तीन अणू ठिकाणांवर टाकले होते. इराणच्या फोर्डो डोंगररांगांतील भूमीगत असलेले अण्वस्त्र निर्मिती स्थळ देखील नष्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. अशातच अमेरिकेने इराणची अन्य ठिकाणे देखील लक्ष्य करू शकलो असतो असे म्हटले आहे. इस्रायल आणि अमेरिकेने एवढे हल्ले केले आहेत. परंतू या दोन्ही देशांनी एका ठिकाणाकडे ढुंकून देखील पाहिलेले नाहीय.
2 / 8
अमेरिका, इस्रायलला कशाची भीती वाटत आहे, फोर्डो, इस्फहान आणि नतांजमध्ये अमेरिकेने १२८ विमानांनी हल्ले केले. त्यात सात बी२ बॉम्बर विमाने होती. या विमानांतून १४ बंकर बस्टर बॉम्ब एकामागोमाग एक टाकण्यात आले. हे बॉम्ब म्हणजे जमिनीत ५० ते १०० फुट आत घुसून फुटतात. म्हणजेच कोणताही भूमीगत बंकर यापासून वाचू शकत नाही. भविष्यात अमेरिका आणखी काही ठिकाणी हल्ले करेलही परंतू इराणमध्ये एक असे ठिकाण आहे जिथे मोठ्या प्रमाणावर युरेनियमचा साठा असूनही तिकडे हल्ला करण्याचा विचार करणे देखील परवडणारे नाही.
3 / 8
या हल्ल्यांपूर्वीच रशियाने सर्वात भयंकर घडेल असा इशारा दिला आहे. हा इशारा काय आहे, कोणत्या धोक्याबाबत रशिया बोलत आहे. अमेरिकाही इराणच्या बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला करण्याची हिंमत करू शकणार नाही असा हा इशारा आहे.
4 / 8
हा इशारा रशियाशिवाय कोणताही देश देऊ शकणार नाही. कारण गोष्ट १९८६ ची आहे, जेव्हा युक्रेन सोव्हिएत युनियनचा भाग होता. चेर्नोबिलच्या अणुभट्टीचा स्फोट झाला होता. त्यात युक्रेनचा एक मोठा भाग उद्ध्वस्त झाला आणि अनेक वर्षे येथे किरणोत्सर्ग पसरत होता. रशियाने जगाला या धोक्याची आठवण करून दिली आहे.
5 / 8
इराणच्या बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाला तर चेर्नोबिलसारखी दुर्घटना घडू शकते, असा इशारा रशियाने दिला आहे. या इशाऱ्यानंतरही अमेरिकेने इराणची अणु क्षमता नष्ट करण्यासाठी हल्ला केला होता. परंतू, अमेरिकेचेही बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला करण्याचे धाडस झालेले नाही.
6 / 8
गुरुवारी इस्रायलने बुशेहर अणु प्रकल्पाला लक्ष्य करण्याची घोषणा देखील केली होती. परंतू, नंतर त्याचे गांभीर्य ओळखून इस्रायली सैन्याने (IDF) ही घोषणा खोटी असल्याचे म्हटले होते.
7 / 8
नतान्झ, इस्फहान, अरक आणि फोर्डो अशा चार अणुउर्जा ठिकाणांवर इस्रायल आणि अमेरिकेने हल्ले केले आहेत. इस्रायलने अराकमध्ये नष्ट केलेली अणुभट्टी ही बांधकामाच्या टप्प्यात होती. तसेच हेवी वॉटर प्रकल्पालाही उडविण्यात आले. ही दोन्ही केंद्रे अद्याप सुरू झाली नसल्याने, तेथे अणुसामग्री नव्हती.
8 / 8
जड पाण्याच्या अणुभट्टीद्वारे प्लुटोनियम बनवता येते, जे एक अणुसामग्री आहे आणि समृद्ध युरेनियमप्रमाणेच अणुबॉम्ब बनवण्यासाठी वापरले जाते.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाrussiaरशिया