शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अलास्का भूकंपाच्या धक्क्याने हादरले!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2018 6:20 PM

1 / 8
अलास्काच्या दक्षिणेकडे असणाऱ्या केनाई उपद्वीपला 7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा तीव्र धक्का बसला आहे.
2 / 8
भूकंपांमुळे अलास्कातील अनेक रस्ते खचले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
3 / 8
अलास्का भूकंपाने हादरले असून मोठ्याप्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
4 / 8
7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा फटका परिसरातील जवळपास 10 हजाराहून अधिक नागरिकांना बसला आहे.
5 / 8
भूकंपामुळे परिसरातील इमारती, पूल कोसळले आहेत. तसेच रस्त्यांनाही मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत.
6 / 8
भूकंपाचं केंद्र एंकोरेज या शहराच्या उत्तरेला 7 मैलावर होतं. भूकंपामुळे 40 वेळा कंपनं जाणवली.
7 / 8
भूकंपानंतर परिसरातील वीजपुरवठा हा खंडीत करण्यात आला. एंकोरेज आणि परिसरातील क्षेत्रात सुमारे 4 लाख नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली आहे.
8 / 8
भूकंपानंतर 'नॅशनल ओशियनिक अॅण्ड अॅटमोस्फियरिक एडमिनिस्ट्रेशन' यांच्याकडून त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, उत्तर अमेरिकेतील कॅनेडियन क्षेत्राचं मूल्यांकन केल्यानंतर त्सुनामीचा इशारा मागे घेण्यात आला.
टॅग्स :Earthquakeभूकंप